Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांचे मनोमिलन घडवून आणणार म्हणणाऱ्या रक्षा खडसेंनी हात झटकले
Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांचे मनोमिलन घडवून आणणार म्हणणाऱ्या रक्षा खडसेंनी हात झटकले

Raksha Khadse on Eknath Khadse and Girish Mahajan : भाजपचे मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कधीकाळी हे दोघेही एकाच पक्षात म्हणजे भाजपात होते. मात्र कालांतराने दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झालं. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अनेक महिने केला होता.... मात्र अद्यापही त्यात यश न आल्याने आज रक्षा खडसे यांनी दोघांच्या मनोमीलनातून हात झटकल्याचा समोर आलं आहे.. आज बुलढाणा येथे नियोजन समितीच्या बैठकीसाठी रक्षा खडसे आल्या असता त्यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की , हा विषय जुना झाला आहे... आता तुम्ही त्या दोघांनाच याबद्दल विचारा... मात्र म्हणून त्यांनी मनोमिलनाच्या केलेल्या प्रयत्नातून अपयश आल का...? किंवा हा विषय खरच जुना झाला का...? हा प्रश्न निरुत्तरित राहिला आहे.
रक्षा खडसे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
# केंद्र सरकार युवकांसाठी खेळ विभागाकडून चांगली पावले उचलत आहे , युवक कल्याण विभाग ही यासाठी चांगले प्रयत्न करत आहे.
# राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे. आम्ही त्यांना मदत केली आहे. त्यांनीही आम्हाला मदत केली आहे , त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेऊ शकतात.
# राज्यात महायुतीची सरकार आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा महायुतीचा आहे. त्यामुळे पालकमंत्री कुठल्या पक्षाचा आहे याला महत्त्व नाही. तो महायुतीचा आहे आणि सर्वांनी त्यांचा आदर करायलाच पाहिजे.
# नितेश राणे यांनी बुरखा घालून परीक्षेला प्रवेश न देण्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांना गैरप्रकार रोखायचे असतील , मुलांच्या परीक्षा सारख्या होण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल.
उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील भेटीबाबत बोलताना खडसे म्हणाल्या, राजकीय निर्णय हे लग्न कार्यक्रमात किंवा बाहेर कुठे ठरत नसतात...राजकीय लोकांचे व्यक्तिगत संबंध असतात....राजकीय भविष्य हे उद्घाटन किंवा लग्न समारंभात ठरतं नसतं..
रणजितसिंह मोहितेंवर निलंबनाची कारवाई होण्याची चर्चा सुरु असतानाच बावनकुळेंच्या पत्राने भुवया उंचावल्याhttps://t.co/7v3w4HBCXO
— ABP माझा (@abpmajhatv) January 30, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
