Donald Trump on India : मिले सुर मेरा तुम्हारा! एलाॅन मस्क यांनी भारताची मदत रोखताच ट्रम्प म्हणाले, 'आम्ही त्यांना 182 कोटी का देतोय? भारत हा जगातील...'
मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DoGE) शनिवारी हा निर्णय घेतला. DOGE ने यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विभागाकडून 15 प्रकारच्या कार्यक्रमांचा निधी रद्द करण्यात आला आहे.

Donald Trump on India : आम्ही भारताला 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (182 कोटी रुपये) का देत आहोत? त्यांच्याकडे खूप पैसा आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त दर असलेल्या देशांपैकी एक आहे, विशेषतः आमच्यासाठी, अशा शब्दात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मदत रोखताच प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांचे राईट हँड DoGE प्रमुख एलाॅन मस्क यांनी शनिवारी भारताला दिलेला 182 कोटी रुपयांचा निधी रद्द केला. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DoGE) शनिवारी हा निर्णय घेतला. DOGE ने यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विभागाकडून 15 प्रकारच्या कार्यक्रमांचा निधी रद्द करण्यात आला आहे. यापैकी, जगभरातील निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्याचा एक कार्यक्रम देखील आहे, ज्याचा निधी 4200 कोटी रुपये आहे. या फंडात भारताचा हिस्सा 182 कोटी रुपये आहे.
कुरेशी म्हणाले, अहवालात सत्याचा अंशही नाही
दरम्यान, या वादावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "2012 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून माझ्या कार्यकाळात भारतातील मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी एका अमेरिकन एजन्सीने कोट्यवधी डॉलर्सचा निधी दिल्याच्या मीडिया वृत्तात एकही तथ्य नाही." SY कुरेशी यांनी माहिती दिली की ते 2012 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त असताना IFES सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने इतर अनेक एजन्सी आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थांसोबत असेच करार केले होते. इच्छूक देशांना निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण आणि संसाधन केंद्रात म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) मध्ये प्रशिक्षण देता यावे म्हणून हा करार करण्यात आला.
कुरेशी म्हणाले की, सामंजस्य करारामध्ये कोणत्याही पक्षावर कोणत्याही प्रकारची आर्थिक आणि कायदेशीर जबाबदारी राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही संदिग्धतेला वाव नसावा म्हणून ही अट दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. या सामंजस्य करारातील पैशाचा कोणताही उल्लेख पूर्णपणे खोटा आहे. एमओयू हा दोन किंवा अधिक पक्षांमधील कराराचा दस्तऐवज आहे. या मेमोरँडममध्ये, एक सामायिक कार्यक्रमाची रूपरेषा दर्शविली जाते आणि एकत्र काम करण्याचे ठरविलेल्या गोष्टींची नोंद केली जाते.
बांगलादेशला मिळणारा निधीही बंद झाला
DoGE ने जाहीर केलेल्या यादीत बांगलादेशला मिळणाऱ्या 251 कोटी रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. बांगलादेशातील राजकीय वातावरण मजबूत करण्यासाठी हा निधी दिला जात होता. बांगलादेशातील शेख हसीना सरकार पाडण्यासाठी अमेरिकेचे डीप स्टेट (अमेरिकेडून पडद्याआडून होणारी कारवाई) संशयास्पद मानले जात असताना हा निधी रोखण्यात आला आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांना याबाबत विचारण्यात आले असता, बांगलादेशातील सत्तापरिवर्तनात अमेरिकेचा हात नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
ट्रम्प म्हणाले, यात आमच्या डीप स्टेटची कोणतीही भूमिका नाही. हे असे काहीतरी आहे ज्यावर भारतीय पंतप्रधान बर्याच काळापासून काम करत आहेत. अनेक वर्षांपासून यावर काम सुरू आहे. मी याबद्दल वाचत आहे, पण पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलले तर बरे होईल. मात्र, ट्रम्प यांनी भारताच्या वतीने कोणत्या कामाचा उल्लेख केला होता हे स्पष्ट झालेले नाही. यानंतर पीएम मोदी आणि ट्रम्प यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये दोघांनी बांगलादेशातील परिस्थितीवर चर्चा केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

