एक्स्प्लोर

NGO : मनोरुग्णांसाठी काम करणारा खराखुरा मसिहा आतिश सिरसाट; अफाट, अद्वितीय काम

मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अगदी आपुलकीने आणि निस्वार्थपणे हे काम करण्याचे धाडस केलेय सोलापूरच्या आतिश सिरसाट या तरुणाने. 

NGOs who are making a difference : रस्त्यांनी जाताना मळकट कपडे, कधी-कधी कपडे न घातलेले, वाढलेले केस, दाढी असणारे आणि समाजाच्या दृष्टीने विक्षिप्त अशी लोकं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. रस्त्याच्या कडेला, खांबाच्या आडोशाला, पायऱ्यांच्या जवळ जिथे आसरा मिळेल तिथे अशी लोकं पडलेली असतात. आपण सामान्य माणूस म्हणून अगदी सहजपणे या लोकांकडे पाहत दुर्लक्ष करून निघून जातो. जमलच तर काही सुट्टे पैसे काढून त्यांना स्पर्श न करता दुरूनच त्यांच्या समोर टाकतो. क्वचितच काही असेल तर खायला देतो. अशी लोकं 'मनोरुग्ण' म्हणून ओळखली जातात. आपण ज्या समाजात वावरत असतो, प्रतिष्ठेचा टेंभा मिरवत असतो त्याच प्रतिष्टीत समाजातून ही लोकं आलेली असतात. काही कारणास्तव त्यांची अशी अवस्था होते. सुज्ञ म्हणून वावरणारे आपण या लोकांना 'वेडा' आहे असे संबोधन देऊन एकप्रकारे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच टाकत असतो. मात्र ते माणूस असतात. कॅन्सर, मलेरिया अशा प्रकारचे जे लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात तशाच प्रकारचा मनाचा रोग यांना झालेला असतो. ह्या मनोरुग्णांच्या जवळ देखील जायला सहजासहजी कुणी धजावत नाही. अनेकांना त्यांची किळस येते तर अनेकांना भीती वाटते. मात्र त्यांच्याही काही भावना आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायला मात्र कुणी पुढे येत नाही. मनोरुग्णांना जवळ घेत त्यांना योग्य उपचार दिले तर ते मुख्य प्रवाहात येऊ शकतात. अशा मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अगदी आपुलकीने आणि निस्वार्थपणे हे काम करण्याचे धाडस केलेय सोलापूरच्या आतिश सिरसाट या तरुणाने. 

सोशल मीडियाचा सदुपयोग

प्रत्येक शहरात एक आकर्षणाचं केंद्र असलेलं मंदिर असतं. जिथ अनेक लोक काहीतरी मागायला आलेले असतात, काही लोकं शांतता वाटते म्हणून आराम मिळावा यासाठी येतात. सोलापूरला असच सिद्धेश्वराच मंदिर आहे. या मंदिरात खाजगी कंपनीत नोकरीला असलेला आतिष या मंदिरात रोज काही वेळ घालविण्यासाठी यायचा. दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. मंदिराच्या एका कोपऱ्यात 28-29 वर्षांची एक स्त्री अतिशय विद्रुप अवतारात दिसायची. केस विस्कटलेले. मळकट अवतार. ती काहीच खात नसायची. लोकांनी काही दिलं तर साठवून ठेवायची. तिने स्वतःभोवती  पाण्याच्या बाटल्यांचे अक्षरशा थडगेच रचलेले. आतिष तिला रोज पाहायचा. चार-पाच दिवसांनी तिला बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ती बोलत नसायची. दोन-तीन दिवसांनी एका मावशीच्या मदतीने तिच्याशी बोलला तर ती संवाद साधू लागली. तिला काहीच आठवत नव्हतं. काहीच खात नव्हती. आतिशने एक दिवस घरून दाळभात आणला आणि तिच्याजवळ बसून स्वतः खाल्ला. तर तिने हिसकावून घेऊन तिने खाल्ला. आतिशने त्या मावशींना मदतीला घेतले. त्यांनी तिला आंघोळ घातली, केस व्यवस्थित केले. ती खूप सुंदर दिसू लागली. मात्र आता अतिशला भीती वाटायला लागली की कुणी तिच्यासोबत काही बरेवाईट तर करणार नाही ना? या भीतीतून त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली. फेसबुकवर रणजित कांबळे (रणबीरा) आणि अमित प्रभा वसंत या मित्रांनी श्रद्धा फाउंडेशन बद्दल त्याला माहिती दिली. हे फाउंडेशन मनोरुग्ण लोकांवर उपचार आणि पुनर्वसन करण्याचे काम करते. आतिशने त्यांच्याशी संपर्क केला. सरकारी मदत न मिळालेल्या अतिशला श्रद्धा फाउंडेशनच्या रूपाने आशेचा किरण दिसला. फाउंडेशनचे कार्यकर्ते सोलापुरात आले आणि त्या महिलेला घेऊन गेले. रमजाना तिचं नाव. आज रमजाना पाच वर्षानंतर बरी झालीय. आणि आपल्या कर्नाटकातील बागलकोट येथील घरी व्यवस्थित राहतेय. ही रमजाना आतिशला एक नवी दृष्टी देऊन गेली. रमजाना सारखे अजून किती असतील याचा शोध त्याने घ्यायला सुरू केले. सोलापुरात दीड वर्षात जवळपास 30 मनोरुग्ण त्याला सापडले. त्यांच्याशी गट्टी करून आतिशने त्यांचे पुनर्वसन केले. या लोकांचा माणसांशी संपर्क नसल्याने त्यांच्या मनावर जास्त परिणाम होतो. आतिश तासनतास अशा रस्ता भरकटलेल्या लोकांशी गप्पा मारतो. त्यांचा विश्वास संपादित करतो. पुरुष रुग्णांची दाढी,कटिंग करणे इतकेच काय त्यांच्या गुप्तांगातील केस काढण्यापर्यंतची सेवा आतिश निस्वार्थ वृत्तीने करतोय. 

आतिशची घरातील परिस्थिती हलाखीची

आतिशची घरातील परिस्थिती हलाखीची होती. वडील मोलमजुरी तर आई धुणीभांडी करायची. घरात पाच जण. आईवडील अन दोघे भाऊ एक बहीण. वडीलांच्या पगारी वर घर चालत नसल्यामुळे मोठ्या भावाला आठवीतूनच शिक्षण सोडावे लागले. त्यात आतिश अन त्याची बहीण बहिण कसेबसे काबाडकष्ट करून शिकले. आतिशच्या आईच्या ऑपरेशनसाठी सावकाराकडून कर्ज काढले होते. त्यामुळे तो आई वडीलासोबत लहान वयातच दर शनिवार- रविवार केटरिंगच्या कामाला जायला लागला. कॉलेजमध्ये असताना दया पवार, बाबूराव बागूल, नरेंद्र जाधव यांच्यासारख्या लेखकांना वाचून उपेक्षित लोकांप्रति त्याच्या मनात आस्था निर्माण झाली. विदयार्थी संघटनेत विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढाई असो, इंदू मिलची लढाई असो, दलित अत्याचाराच्या घटना असो आतिशने रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून चांगलेच रान उठवले. यानंतर त्याने दलित वस्त्यांमध्ये शिक्षणाचे महत्व समजावून सांगणे, रेड लाईट एरियातील महिलांसाठी काम, वंचित महिलांना रोजगारासाठी मदत करणे असे अनेक उपक्रम त्याने राबविले. 

संभव फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम

हे सगळं करत असताना रमजानाच्या रूपाने त्याला मनोरुग्णातील 'चाँद' दिसला. रमजाना ही एक उदाहरण. असे बरेच रुग्ण आतिशच्या प्रयत्नाने सामान्य होऊन घरी परतले आहेत.  मनोरुग्णांसाठी काम करताना बोगस सिस्टममुळे सरकारी दप्तराच्या चकरा मारून मारून शेवटी नैराश्यच हाती आले.  त्याने मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आता आपलं आयुष्य पणाला लावलंय. श्रद्धा पुनर्वसन केंद्राशी संपर्क आला अन दीड वर्षात तीस जणांवर उपचार सुरू करून 13 रूग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. सध्या आतिश सोलापुरमध्ये मनोरुग्णांची काळजी घेत एक वेळच जेवण देण्याच मोठं कार्य करत आहे. त्यांच्या वर प्राथमिक उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतची कामे तो कुठल्याही स्वार्थाशिवाय करतोय. यासाठी सध्या तो स्वतःहुन खर्च करतोय. खाजगी कंपनीत काम करणाऱ्या आतिशला खरतर आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नाहीच. स्वतःचं घर सांभाळून ह्या गोष्टी करणे खरंतर फार कठीण काम आहे, हे सांगायची गरज नाहीच. या कामासाठी त्याला पत्नी राणी, आई कविता सोबतच संघपाल घोडकुंभे, मनोजकुमार भालेराव, प्रशांत कांबळे, वैभव महाडिक, संतोष माने, सागर शितोळे, इम्तियाज मालदार या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे आतिश सांगतो. काहीही असंभव नाही असे मानणाऱ्या आतिशने नुकतेच या बेघर व बेवारस मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यासाठी व्यापक दृष्टी ठेवत 'संभव फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. आपल्या सारख्यांना भीतीदायक वाटणाऱ्या आणि अतिउपेक्षित असलेल्या या अनोख्या समाजकार्यात आतिशने स्वतःच आयुष्य समर्पित केलंय. त्याला जमेल त्या स्तरावरून मदत करणे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. कोरोना काळात देखील आतिशच्या संभव फाऊंडेशननं निस्वार्थी भावनेनं मोठं काम केलं आहे. या अनोख्या कामासाठी आतिशला सलाम करावा तेवढा कमीच आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra fadnavis On vinod Patil :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद पाटील भेटRaj Thackeray on Ajit Pawar | काकांनी डोळे वटारले, पहाटेचं लग्न मोडलं, राज ठाकरेंकडून मिमिक्रीSadabhau Khot Majha Katta LIVE : शरद पवारांबाबत वक्तव्य करणारे सदाभाऊ माझा कट्टावर ABP MajhaJob Majha : जॉब माझा : आदिवासी विकास विभाग येथे नोकरीची संधी : 09 Nov 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Embed widget