ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नीलम गोर्हे निर्लज्ज, नमकहराम बाई, संजय राऊतांचं टीकास्त्र, मातोश्रीवर 2 मर्सिडीज दिल्यावरच पद मिळतं, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक https://tinyurl.com/tyntkmtr निलम गोऱ्हेंना निर्लज्ज म्हणता, तुम्हाला लाज वाटते का? मंत्री संजय शिरसाटांनी संजय राऊतांना चांगलंच सुनावलं https://tinyurl.com/257ak6wn
2. संजय राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर, चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हेंनी तसं वक्तव्य करायला नको होतं; शरद पवारांचं परखड मत https://tinyurl.com/mr4rjz3v नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार; सुषमा अंधारे कडाडल्या, प्रकाश आंबेडकरांसोबत सहकारी म्हणून काम केलेल्या भारिप पक्षापासून ते शिवसेनेतील पदापर्यंत सगळंच काढलं https://tinyurl.com/yt3xummx निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; संजय राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/5b7kmw6a
3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव ! संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा आवर्जून उल्लेख https://tinyurl.com/3eh3mbyw फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी मस्साजोगचे सर्व गावकरी आंदोलनात सहभागी होणार; धनंजय देशमुख म्हणाले, आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतीही चर्चा नाही https://tinyurl.com/mjhfjsa9
4. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा, बेकायदा सदनिकाप्रकरणी तात्पुरता जामीन मंजूर; नाशिक सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती https://tinyurl.com/3ujzydxt मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्याची लेक उतरली मैदानात; दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार https://tinyurl.com/3ws8ru3h
5. डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा 'आका' ठाण्यात बसतोय; मनसेच्या राजू पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पुत्र श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2t6sfcwu मंत्री संजय शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका, अंबादास दानवेंचा शिवसेना नेत्याला इशारा https://tinyurl.com/mr4cpexp
6. पुण्यातील गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पोलिसांनी तीन आरोपींची काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं https://tinyurl.com/ufzr28b8 कुंभमेळ्याहून परतताना मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, पहाटेच्या साखरझोपेतच बेळगावमधील 6 जणांचा मृत्यू; 2 गंभीर जखमी https://tinyurl.com/53tshshs
7. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, 'PM किसान योजने'चे पैसे खात्यात! https://tinyurl.com/3ae4edbu महाराष्ट्रात ग्रामीण भागातील घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती https://tinyurl.com/2tmsf5kb
8. उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत परप्रांतीय बर्फगोळा विक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या, शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात https://tinyurl.com/5y98jwbk
9. जालन्यातील चित्रपटगृहात धिंगाणा, दारू पिऊन आले, फुकट 'छावा' दाखवा म्हणून अरेरावी; तोडफोडीच्या घटनेचा CCTV आला समोर! https://tinyurl.com/25hav3n7 जळगावात दहावीच्या परीक्षेदरम्यान रिक्षात बसून कॉपी , शिक्षक अन् विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल; शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू https://tinyurl.com/e4rze2jb
10. विराट कोहली शतकाच्या जवळ असताना श्रेयस, हार्दिककडून चौकारांवर चौकार; पाकिस्तानच्या शोएब अख्तरने चांगलेच सुनावले, म्हणाला, थोडं थांबायचं ना, कशाला फटके मारत होतात https://tinyurl.com/5n6rcv4e शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारचे विराट कोहलीने देखील केले कौतुक; षटक पूर्ण होताच जवळ गेला अन् हातात हात दिला https://tinyurl.com/n35byxfd
*एबीपी माझा स्पेशल*
आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखोंच्या फटाक्यांची आतषबाजी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलीब्रेशन
https://tinyurl.com/3d7n46sz
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 शेतकऱ्यांना मिळणार, खात्यात पैसे न आल्यास काय करावं?
https://tinyurl.com/4ybkv5wj
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सहा दिवस बंद, नेमकं कारण काय?
https://tinyurl.com/yuy3bmf5
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























