LIVE UPDATES | राज्यात तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते ऐन लक्षमीपूजनाच्या दिवशी संपावर
- नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी - India Tour Of Australia : टीम इंडिया यूएईहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना - जहाल नक्षलवादी रमेश मडावीला 10 वर्षानंतर अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई - ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच होणार ट्राफिक मुक्त दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी
बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.
India Tour Of Australia : टीम इंडिया यूएईहून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. यावेळी सर्व भारतीय खेळाडू खास पीपीई किटमध्ये दिसत होते. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी - 20 मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर भारतीय खेळाडू 14 दिवस क्वारंटाईन होणार आहे. या दौर्याची चांगली गोष्ट म्हणजे क्वारंटाईन असतानाही खेळाडू सराव करू शकतील. आयपीएल 2020 वेळी असं नव्हते.
जहाल नक्षलवादी रमेश मडावीला 10 वर्षानंतर अटक, गोंदिया पोलिसांची कारवाई
10 वर्षापासून फरार असलेल्या जहाल नक्षलवाद्याला गोंदिया पोलिसांनी मोठ्या शिताफीतीने छत्तीसगढ राज्यातून अटक केली आहे. या जहाल नक्षलवाद्याचे नाव रमेश मडावी असे आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचे 12 लाख रुपयाचे पुरस्कार देखील होते. रमेश मडावी याने 1997-98 मध्ये नक्षल दलममध्ये सहभाग घेत गोंदिया जिल्यात अनेक मोठ्या नक्षल घटना घडवून आणल्या होत्या. देवरी नक्षल दलम मध्ये त्याची वर्णी एसी एम एल ओ एस कमांडर म्हणून देखील लागली होती . तर देवरी दलममध्ये असताना रमेशने पोलिस स्टेशन चिचगड अंतर्गत येणाऱ्या मगरडोह हद्दीमध्ये पोलिस पथकावर प्राण घातक हल्ला देखील केला होता. तसेच या परिसरात हत्या ,गावकऱ्यांवर हल्ले चढविणे ,सार्वजनिक मालमतेची नासधूस करणे अशा विविध घटनांमध्ये रमेश मडावी याचा सहभाग होता. त्याच्यावर या आधी देखील 13 गुन्हे दाखल आहेत. तर रमेश मडावी हा छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्यात वावरत असल्याची गुप्त माहिती गोंदिया पोलिसांना मिळताच. पोलिसांनी छतीसगढ राज्यातील पोलिसांच्या सहकाऱ्याने सुकमा जिल्ह्यात जाऊन रमेश मडावीला अटक केल्यामुळे पोलिसांना मोठे यश आले आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच होणार ट्राफिक मुक्त
सध्या संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गापासून ते घोडबंदर रस्त्यापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. यावर उपाय म्हणून बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर करता येऊ शकतो. मात्र या मार्गावर 4 ठिकाणी संजय गांधी उद्यानाच्या हद्दीतील जागा असल्याने हे सर्विस रोड पूर्ण करण्यास अडथळा येत होता. आता मात्र वनविभाग ही जागा ठाणे महानगरपालिकेत देण्यास तयार झाला असून लवकरच या चार ठिकाणी देखील सर्विस रोड बांधून वाहतूक कोंडी सुटेल असं शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सांगितले.