एक्स्प्लोर
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही, असे मत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं.
shamima sing garza maharashtra and pasaydan
1/8

मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही, असे मत दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं.
2/8

राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा गाजला. या सोहळ्यात सर्वांच्या भाषणांनी मनं जिंकली.
3/8

साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर संमेनलाच्या कार्यक्रमाचा समारोप पसायदान म्हणून झाला. विशेष म्हणजे काश्मीर कन्या शमिमा अख्तरने या साहित्य संमेलनात सर्वांची मनं जिंकली
4/8

शमीमाच्या सूरमधुर आवाजात गर्जा महाराष्ट्र गीताचे बोल येताच पहाडी व सुरेल आवाजाने दिल्लीतील सभागृह स्वरमय झालं होतं. शमिमा यांना यावेळी, स्वरसाद म्हणून मदर सिद्दिकी यांनीही गर्झा महाराष्ट्र गाणं गायलं
5/8

शमिमाच्या गीताला आणि आवाजाला दाद देत संमेलनस्थळी उभे राहून उपस्थितांनी दाद दिली. तसेच, शमिमाच्या गाण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट देखील पाहायला मिळाला.
6/8

संमेलन उद्घाटन सोहळ्याच्या समारोप्रसंगी पुन्हा शमिमाने माईक हाती घेतला अन् संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान गायिले. शमिमाचे पसायदान ऐकताना पंतप्रधान मोदींसह सर्वच मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.
7/8

दरम्यान, दिल्लीतील मराठी साहित्य संमलेनात मराठी भाषा, संत-साहित्य, साहित्य-सिनेमा यांसह साहित्यविषयक उत्कृष्ट भाषणे पाहायला मिळाली.
8/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतरही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. संमेलनाचा कार्यक्रम उत्साह आणि तितक्यात शांततेच संपन्न झाला.
Published at : 21 Feb 2025 06:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























