Solapur News : सोलापुरातील छ.संभाजी महाराज तलाव अन् भुईकोट किल्लाच्या परिघात मांस विक्रीस बंदी; नेमकं कारण काय?
Solapur News : सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि भुईकोट किल्लाच्या एक किलोमीटर परिघात चिकन आणि अंडी चिकन आणि अंडी विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Solapur News : सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि भुईकोट किल्लाच्या एक किलोमीटर परिघात चिकन आणि अंडी चिकन आणि अंडी विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोलापुरात बर्ड फ्लूचा (Bird Flu) शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून बाधित क्षेत्राच्या परिसरातील एक किलोमीटर पर्यंतचे चिकन शॉप्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल नकारार्थी येईपर्यंत किंवा 4 एप्रिलपर्यंत परिसरातील सर्व दुकाने (Solapur News) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश दिले आहेत.
21 दिवस नागरिकांना परिसरात फिरण्यासाठी प्रवेश बंद
सोलापूर शहरात (Solapur News) छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर महाराज तलाव, भुईकोट किल्ला इत्यादी परिसरात शेकडो कावळ्यांचा मृत्यू झालाय. या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली. हे तीन ही परिसर नागरिकांना फिरण्यासाठी देखील 21 दिवस बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर आता बर्ड फ्लूचा प्रसार इतर पक्षी आणि कोंबड्याना शिवाय मानवाला धोका होऊ नये यासाठी बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील चिकन शॉप आणि अंडी विक्री बंद राहणार आहेत.
घाबरण्याची आवश्यकता नाही, प्रशासनाचे आवाहन
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिध्देश्वर महाराज तलाव, खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झालाय. या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतकीकरणाला सुरुवात झाली आहे. तसेच मृत कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून 21 दिवस बंद केले जाणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे. तर 1 किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्याची देखील तपासणी होणार आहे.
तसेच आरोग्य विभागामार्फत 1 किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसामध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेलं नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
