अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
गृहमंत्री अमित शाह पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे पोहोचले असून उद्या बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र वाटप अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर असून आज सायंकाळी ते पुण्यात पोहोचले. यावेळी, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले होते. आज आणि उद्या असा दोन दिवसीय अमित शहा यांचा पुणे दौरा असून आज कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. उद्या सकाळी 11 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे. तसेच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकारमंत्री म्हणून अमित शहा (Amit shah) उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलीस शाखेकडून देण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे पोहोचले असून उद्या बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र वाटप अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल वेस्टीन बाहेर आज रात्रीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, पुण्यातील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे, नेहमीच वाहतूक समस्येचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांना आता वाहतूकही पुढील 24 तासांसाठी बदल करुन पुढे जावे लागणार आहे.
गृहमंत्र्याचा दौरा, पुण्यातील वाहतुकीत बदल
1) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.
2) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.
3) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.
जड, अवजड वाहनांना बंदी...
1) पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक- पाषाण रोड
2) पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक- बाणेर रोड
3) पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल - औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार
जड वाहनांना शहरात 24 तास बंदी
शनिवार (दि. २२) मध्यरात्री १२ ते रविवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना तसेच मिक्सर, डंपर, हायवा व स्लो मूव्हिंग (जेसीबी, रोड रोलर) वाहनांना सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
