Dr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!
Dr Tara Bhawalkar : मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही असे मत दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (Dr Tara Bhawalkar) यांनी व्यक्त केलं. एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हे महत्वाचं नाही तर गुणवत्ता हा विषय महत्वाचा आहे असंही तारा भवाळकर म्हणाल्या. मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत असेही भवाळकर म्हणाल्या. तारा भवाळकरांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोद आणि शरद पवारांनी दाद दिली.
मराठी भाषा बोलण्यातून विस्तारली
भाषा ही बोलली तर जीवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून उपयोग नाही असेही तारा भवाळकर म्हणाल्या. महाराष्ट्राला पाडुंरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आमच्या संतांनी जीवंत ठेवल्याचे त्या म्हणाल्या. मराठी भषा बोलण्यातून विस्तारली आहे, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातील मावळे मिळाले असेही तारा भवाळकर म्हणाल्या.























