Horoscope Today 16 March 2025 : आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार खास; सूर्यदेवाची राहील सदैव कृपा, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 March 2025 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 March 2025 : पंचांगानुसार, आज 16 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी धंद्यामध्ये शुद्ध वैचारिक भूमिका ठेवल्यामुळे दूरगामी फायदे होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
समस्या येतील पण समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
कलाकार लोकांना कलेच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज काही स्फूर्तीदायक घटना घडतील महिला जरा जास्तच रसिक बनतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज खूप काम करावेसे वाटेल. स्त्रियांना जोडीदाराची जमवून घ्यावे लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिकारशी झगडा करण्यात धन्यता मानाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
उद्योग व्यवसायात कष्टाचे डोंगर उपसावे लागले तरी सर्व करण्याची तयारी दर्शवाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
प्रयत्नांनी यश प्राप्ती नक्की होईल मानापमान जरा जास्त टोकदार होतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
स्वतःबद्दल नसत्या कल्पना करून घेऊ नका कधीतरी अना ठायी उत्साह दाखवाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
घरामध्ये आवश्यक नाही अशा गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
अहंकार आणि हटवादी वृत्ती सोडून परिस्थितीशी दोन हात करायला सिद्ध व्हाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मानसिक अस्वस्थता वाढेल आर्थिक निर्माण झालेले प्रश्न जरा जास्तच चिघळतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
