एक्स्प्लोर

प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना

आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.  

धुळे : जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमर्दा येथील 4 युवक काळापाणी गावांत आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळ पाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत (Crime News) एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह काळापाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच त्याच्यावर अंत्यविधी केले. तसेच, आरोपीच्या घरांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.  

उमर्दा गावातील 20 वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर,या चौघांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली व त्यानंतर उमर्दा गावातील ग्रामस्थांना यासंदर्भात माहिती दिली. आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी काळपाणी गावातील नागरिकांनी केली. त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली व कमलसिंग पावरा याच्यासंदर्भात विचारले असता तो रात्रीच येथून पळून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर उमर्दा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावराचा शोध घेतला असता, तो दोन्ही गावच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला व नंतर त्याला या नाल्यात फेकून दिलाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेत कमल सिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला. कमल सिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर उमर्दा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमल सिंग पावराचा मृतदेह थेट काळापाणी गावात नेला. त्यानंतर, त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या घरासमोरच त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी, संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड करत नुकसान देखील केले आहे.या संपूर्ण प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत 7 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा

मला खूप राग आलाय, तरीही...; ट्विट करुन डिवचणाऱ्या नेत्यावर संतापल्या अंजली दमानिया; अजित पवारांना चॅलेंज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik NEET Paper Leak: माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
Virar Crime : भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं
भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं
Nashik Neet Paper Leak: NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी 'असं' केलं जेरबंद; हेअरस्टाईल बदलली तरी 'बाझ' नजरेनं हेरलं
NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी 'असं' केलं जेरबंद; हेअरस्टाईल बदलली तरी 'बाझ' नजरेनं हेरलं
Virar Attack : विरारमध्ये मंडल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट
विरारमध्ये मंडल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Embed widget