WPL Final : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन, फायनलमध्ये पराभवाची दिल्लीची हॅट्ट्रिक, हाती आलेला सामना गमावला
WPL Final : मुंबई इंडियन्स दुसऱ्यांना बनली WPL चॅम्पियन, दिल्लीचा लागोपाठ तिसऱ्या फायनलमध्ये पराभव, हाती आलेला सामना गमावला

MI vs DC Final : महिला आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केलाय. मुंबईने दुसऱ्यांच्या WPL ट्रॉफीवर नाव कोरलंय, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागलाय. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. मुंबईच्या 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 धावांनी दूर राहिला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. दिल्लीने हाती आलेला सामना गमावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Emotions! 😊🥺
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
Updates ▶ https://t.co/2dFmlnwxVj #TATAWPL | #DCvMI | #Final pic.twitter.com/4XRPVeQQzZ
हरमनप्रीत आणि ब्रंटची फटकेबाजी
नाणेफेक हरल्यानंतर मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. खराब सुरुवातीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी 89 धावांची भागीदारी करून मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. एकीकडे हरमनप्रीतने कर्णधारपदी 66 धावांची खेळी केली, तर दुसरीकडे स्कायव्हर-ब्रंटने 60 धावा ठोकल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा मारिजने कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याशिवाय कोणीही मोठी खेळी करू शकले नाही.
मुंबईने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावलं
मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबईचा संघ महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये विजयी झाला होता. त्या सामन्यात एमआयने दिल्लीचा 7 गडी राखून पराभव केला होता, तर यावेळी दिल्लीला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई हा एकमेव संघ आहे जो दोनदा WPL चॅम्पियन बनला आहे.
Marizanne Kapp breaking the shackles 🔥#DC need 35 from 24 ‼
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
Folks, did anyone say the edge of the seat Finale 😉
Updates ▶ https://t.co/2dFmlnwxVj #TATAWPL | #DCvMI | #Final | @DelhiCapitals pic.twitter.com/d49UqZU8qi
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
