Zee Marathi Announce Devmanus Serial Teaser: 'झी मराठी'नं TRP साठी कंबर कसली; 'देवमाणूस' परत येतोय, पण, मुख्य भूमिकेत किरण गायकवाडच दिसणार?
Zee Marathi Announce Devmanus Serial Teaser: 'झी मराठी'च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरुन 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Zee Marathi Announce Devmanus Serial Teaser: टीआरपीच्या (TRP) शर्यतीत कमबॅक करण्यासाठी 'झी मराठी'नं मालिकाविश्वातील (Zee Marathi Serial) तुफान गाजलेल्या एका मालिकेचा नवा सीझन सुरू करण्याची घोषणा केली आहे. 'झी मराठी'वरच्या 'लक्ष्मी निवास', 'पारू', 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता या मालिकांमध्ये 'झी मराठी' आणखी एका नव्या मालिकेची भर घालत आहे. 'झी मराठी' आपली महाराष्ट्रभरात तुफान गाजलेली मालिका 'देवमाणूस' (Devmanus Serial) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.
'झी मराठी'च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरुन या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'देवमाणूस' ही अशी मालिका जिच्या दोन्ही पर्वांनी अक्षरशः लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. प्रेक्षकांनी या मालिकेच्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम दिलं. अशातच आता या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'झी मराठी'कडून 'देवमाणूस' (Devmanus 3) च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, 'देवमाणूस'ची निर्माती असलेली अभिनेत्री श्वेता शिंदेनंही देवमाणूसच्या नव्या वर्वाविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. या मालिकेच्या चाहत्यांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. झी मराठी गेल्या काही दिवसांपासून नवनव्या कार्यक्रमांची घोषणा करत आहे. टेलिव्हिजन विश्वातील सर्व गणितं टीआरपीवर अवलंबून असतात, अशातच गेल्या वर्षभरात झी मराठीनं प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी आणि मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी वाहिनीवर अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल केल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
किरण गायकवाड कमबॅक करणार?
'मधला अध्याय' सुरू होणार घरोघरी… 'देवमाणूस' परत येतोय खबर आहे खरी! लवकरच…", असं कॅप्शन देत वाहिनीनं या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'देवमाणूस'मधून गाजलेला अभिनेता किरण गायकवाड यानंही 'देवमाणूस 3'चा टीजर शेअर केला होता. टीझर शेअर करत त्यानं लिहिलंय की, "आता या देवमाणसाचं स्वागत करा... तो येतोय भेटायला. 'मधला अध्याय' सुरू होणार घरोघरी, 'देवमाणूस' परत येतोय खबर आहे खरी! देवमाणूस - लवकरच... आपल्या झी मराठीवर!" अभिनेता किरण गायकवाडनं स्वतः पोस्ट शेअर केल्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडले आहेत. किरणच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
किरण गायकवाडनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तो या मालिकेत असणार की, नाही? असा सवाल थेट किरणला केला आहे. 'तू देवमाणूस नसणार आहेस का?', 'तुम्ही आहात की दुसरं कोणी? आम्हाला तुम्हालाच बघायला आवडेल', 'आम्हाला तुम्हीच हवे आहात', अशा अनेक कमेंट करुन चाहत्यांनी किरण गायकवाडला विचारणा केली आहे.
चाहत्यांच्या कमेंटवरुन 'देवमाणूस'मधून किरण गायकवाडनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय, हे स्पष्ट होत आहे. आता राहिला प्रश्न किरण गायकवाड देवमाणूसच्या तिसऱ्या पर्वात दिसणार की नाही? अभिनेत्री पूर्वा शिंदेनं किरण गायकवाडचं नाव घेत कमेंट केल्यामुळे आता किरणच देवमाणूसच्या तिसऱ्या पर्वात झळकणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























