एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2025 : नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?

Vidhan Parishad Election 2025 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली असून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.

Vidhan Parishad Election 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2025) जाहीर झाली आहे. 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या (BJP) तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) एका आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशींचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena Shinde Faction) वाट्याला विधानपरिषदेची एक जागा असून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सावध पाऊले उचलण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेतून 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांचं नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व ही शीतल म्हात्रे यांची सध्याची ठळक ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे (Sanjay More) यांचं देखील नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर नागपूरच्या किरण पांडव (Kiran Pandav) यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहे. 

एकनाथ शिंदे सावध पाऊले उचलण्याची शक्यता

तर विधानपरिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पाऊले उचलण्याची शक्यता आहे. आज नाव जाहीर झाल्यास होणारे नाराजी नाट्य टाळण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ऐनवेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार थेट उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. आज नाव जाहीर करण्यात यावं, अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता एकनाथ कोणत्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Arya Encounter : सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंकडून रोहित आर्यचा एन्काऊंटर
Rohit Arya Encounter : पवईतील थरारनाट्य, पोलीस एन्काऊंटरमध्ये रोहित आर्याचा मृत्यू
Powai Hostage Crisis: मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू, संपूर्ण बातमी
Mumbai Hostage Crisis: 'सरकारनं दोन कोटी थकवले', Rohit Arya चा गंभीर आरोप, Kesarkar कनेक्शन समोर
Satara Doctor Case : संशयित आरोपी प्रशांत बनकरचा लॅपटॉर पोलिसांनी केला जप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
Mumbai Children Hostage: 17  मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
बच्चू कडूंचं ‘रेल रोको' आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
Embed widget