आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Car VIP Number Registration Fees: व्हीआयपी नंबर घेण्याची ऑनलाइन सुविधा 25 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून त्यामध्ये तुम्ही परिवहन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि शुल्क भरू शकता. नंबर प्लेटची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी परिवहन विभागानं हे पाऊल उचललं आहे.
Car VIP Number Registration Online: सध्याच्या टेक्नोसावी जगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत आपल्या दैनंदिन गरजा वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मोबाईल, इंटरनेट यासोबतच एखादी गाडी यांसारख्या गोष्टींचा समावेश करणं अनिर्वाय झालं आहे. मग ती गाडी कोणतीही असो, दुचाकी किंवा चारचाकी. माणसं एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडतील, पण आपल्या गाडीवर प्रेम करतील. अनेकांचा आपल्या गाडीवर प्रचंड जीव जडतो. त्यामुळेच प्रिय असणाऱ्या गाडीसाठी एक वेगळा आणि युनिक नंबर असावा असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे व्हीआयपी नंबर घेण्यासाठी अनेकजण वर्ष-वर्षभर वाट पाहतात. तर, आपल्या आवडीचा नंबर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. तुम्हीही यांच्यातीलच एक असाल आणि आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर (VIP Number) घेण्याच्या प्रतिक्षेत असाल, तर चिंता सोडा. आता उगाच वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत राहावं लागणार नाही.
तुमचा आवडीचा नंबर मिळवणं अगदी सोपं
आता तुम्हाला व्हीआयपी नंबर प्लेट मिळवण्यासाठी एखआद्या ब्रोकर्स आणि इतर ओळखीच्या लोकांची गरज भासणार नाबी. तर तुम्ही थेट Parivahan (परिवहन) वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन यासाठी अर्ज करू शकता. पण, लक्षात ठेवा ही सुविधा फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठीच आहे.
व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची ऑनलाईन सुविधा महाराष्ट्रात आली आहे. तुम्ही यासाठी पेमेंट ऑनलाईन ट्रान्सफर देखील करू शकाल आणि घरी बसून तुम्हाला तुमच्या कारसाठी व्हीआयपी नंबर मिळेल. महाराष्ट्र परिवहन विभागानं ही सेवा सुरू केली असून यामध्ये तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर नंबर प्लेट मिळणार आहे.
व्हीआयपी क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज (Online Application For VIP Number)
ही सुविधा 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुम्ही परिवहन वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि शुल्क ऑनलाईन भरू शकता. एजंटची गरज दूर व्हावी आणि लोकांना त्यांच्या पसंतीची नंबर प्लेट थेट मिळावी यासाठी परिवहन विभागानं नंबर प्लेटची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
VIP नंबरसाठी फी किती? (How Much is Fee For VIP Number?)
महाराष्ट्रात तुम्हाला वेगवेगळ्या व्हीआयपी नंबर्ससाठी लाखो रुपये चुकवावे लागू शकतात.
- जर तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल, तर या गाडीचं रजिस्ट्रेशन करुन '1' नंबर घेण्यासाठी तुम्हाला तब्बल 6 लाख रुपये द्यावे लागतील.
- याच नंबरची टू व्हीलर घेण्यासाठी तब्बल 1 लाख रुपये मोजावे लागतील.
- तेच 99, 999, 786, 9999 यांसारख्या नंबर्ससाठी 50,000 ते 2.5 लाख रुपये फी द्यावी लागते.
- इतर व्हीआयपी नंबर्ससाठी तुम्हाला 25,000 ते 1 लाख रुपये खर्च करावे लागतात.