एक्स्प्लोर
Advertisement
बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील : राहुल गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आजही त्यांनी महागाई भत्त्याच्या कपातीविषयी ट्विट करुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात केलेल्या कपातीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कर्माचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करणं सरकारचा हा निर्णय असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. आजही त्यांनी महागाई भत्त्याच्या कपातीविषयी ट्विट करुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.
अर्थमंत्रालायाने दिलेल्या आदेशात सांगितले होते की, कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी जानेवारी, जुलै आणि पुढील वर्षी जानेवारीला मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त हप्ता दिला जाणार नाही. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले, कोरोनाच्या संकटात देखील केंद्र सरकारने 20 हजार कोटीचा केंद्रीय व्हिस्टा प्रकल्प स्थगित केला नाही. तसेच 1 लाख 10 हजार कोटीचा प्रकल्प थांबविला नाही आणि कोणत्याच सरकारच्या अतिरिक्त खर्चात कपात केल्यााची घोषण केली नाही. ज्यामुळे सरकारचे वर्षाला 2 लाख 50 हजार कोटी वाचू शकतात. राहुल गांधी यांचं हे ट्विट प्रियंका गांधी यांनीही रिट्विट केलं आहे. संबंधित बातम्या :#Covid19 लॉकडाउन से रोज़ की रोटी कमाकर जीवन चलाने वाले भुखमरी का शिकार हो रहे हैं। झुँझलाहट और नफ़रत से किसी भी समस्या का समाधान नहीं होता।इस संकट में हमारे बेसहारा भाई बहनों को अन्न और जीविका की सुरक्षा देना सरकार की प्राथमिकता होनी ही चाहिए।https://t.co/CEDg7gkqDy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 23, 2020
कोरोना संकटाने आपल्याला स्वयंपूर्ण होण्याचा संदेश दिलाय; पंतप्रधान मोदींचा देशभरातील सरपंचांशी संवाद
Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी सकारात्मक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दावा
PM interacts with Sarpanch | पंतप्रधान मोदींचा सरपंचांशी संवाद; ई-ग्राम स्वराज अॅप, स्वामित्त्व योजना सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement