एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना संकटाने आपल्याला स्वयंपूर्ण होण्याचा संदेश दिलाय; पंतप्रधान मोदींचा देशभरातील सरपंचांशी संवाद
पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व सरपंचाशी संवाद साधला. यावेळी आपण सर्वांनी स्वयंपूर्ण झाले, पाहिजे असा संदेश त्यांनी दिला.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. कोरोनामुळे सर्व परिस्थिती बदलली असून जे कार्यक्रम समोरासमोर घेतले जात होते. तेच आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घ्यावे लागत आहेत.
आपण आत्मनिर्भर बनले पाहिजे, असा संदेश या कोरोना संकटाने आपल्याला दिला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी दिला. गावे त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. जिल्हा त्याच्या स्तरावर, तर, राज्य त्यांच्या स्तरावर स्वयंपूर्ण झालं पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे, हे आता अत्यंत आवश्यक झाले आहे. एक काळ असा होता देशातील शंभरहून कमी पंचायत ब्रॉडबँडशी जोडल्या होत्या. मात्र, आता सव्वा लाखांपेक्षा जास्त पंचायतींमध्ये पंचायत ब्रॉडबँड पोहोचलं आहे.
Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी सकारात्मक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दावा
खेड्यांनी आदर्श उभा केला
सरकारने भारतात मोबाइल बनविण्याची मोहीम सुरू केली आहे, याचाच परिणाम म्हणजे आज कमी किमतीत स्मार्ट फोन गावागावात पोहोचले आहेत. आज इतक्या मोठ्या प्रमाणात होणार्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळेच सर्व शक्य झाले असल्याचे पंतधान मोदी यांनी सांगितले. या संकट काळात गावातील लोकांनी आपली संस्कृती दाखवली आहे. त्यांच्या या गोष्टींचे विद्वानांनी देखील कौतुक केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा संदेश तुम्ही सर्वांनी जगाला दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रत्येक खेड्यापाड्यात चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. भारताने कोरोनाशी चांगला मुकाबला केलाय, अशी जगात चर्चा आहे. कमी साधन सामग्रीमध्ये आणि कठीण काळात तुम्ही सर्वजण खंबीरपणे साथ देत आहात. या वैश्विक महामारीतही भारताने या दोन तीन महिन्यात याचा चांगला सामना केला आहे.
आज जी संकेतस्थळं सुरू करण्यात आली आहेत, त्या माध्यमातून गावागावांत माहिती पोहोचवणे आणि गावात मदत करणे वेगवान होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातल्या मालमत्तेचे ड्रोनद्वारे ऑडिट केले जाणार असून, त्यानंतर स्वामित्वचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये मालमत्तेच्या मालकीवरून जे वाद सुरू आहेत, ते संपुष्टात येणार आहेत.
Corona Mumbai | वाढदिनी आई कर्तव्यावर, मुलाचा आरोग्य कर्मचारी असलेल्या आईला संदेश, व्हिडीओ व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement