Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 14 मार्चला वाढदिवस असून त्याआधीच त्याने मीडिया आणि पापाराझींसोबत वाढदिवसाचा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, यावेळी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख मीडियाला करून दिली. गौरी असे तिचे नाव असून ती मूळची बंगळुरूची आहे. या खास क्षणी आमिरने गौरीसोबतच्या नात्यावरही भाष्य केले. तो म्हणाला, “मी गौरीला गेल्या पंचवीस वर्षांपासून ओळखतो. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही दोघे एकत्र आहोत.”
आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे त्याच्या नव्या नात्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मीडियाकडूनही प्रश्न विचारले गेले. 'तू गौरीसोबत लग्न करणार का?' या एबीपी न्यूजच्या प्रश्नावर आमिरने थोड्या विनोदी शैलीत उत्तर दिले. तो म्हणाला, "वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करणं सूट होत नाही. आम्ही दोघे सोबत आहोत आणि खुश आहोत. लग्नाचा विचार पुढे करू."
आमिरचे यापूर्वी दोन लग्न
आमिर खानने याआधी दोन विवाह केले आहेत. पहिली पत्नी रीना दत्त हिच्याशी त्याने १९८६ मध्ये लग्न केले होते, तर दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. आता गौरीसोबत असलेल्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. या खास सेलिब्रेशनमध्ये आमिर खान अत्यंत आनंदी दिसला. त्याने मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला
गौरी कोण आहे?
आमिर खानची नवी गर्लफ्रेंड गौरी ही मूळची बंगळुरूची असून ती गेल्या अनेक वर्षांपासून आमिरच्या ओळखीची आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आमिरने स्पष्ट केले. "गेल्या पंचवीस वर्षांपासून मी गौरीला ओळखतो, पण अडीच वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत," असे आमिरने सांगितले.
आमिरच्या वैवाहिक आयुष्यातील प्रवास
आमिर खानने याआधी दोन वेळा विवाह केला आहे. १९८६ मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. मात्र, २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु २०२१ मध्ये त्यांचेही लग्न संपुष्टात आले. आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
वाढदिवसाची खास भेट
आमिर खानने मीडियासोबत वाढदिवस साजरा करताना केक कट केला आणि त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयीही थोडक्यात माहिती दिली. सध्या तो एका नव्या चित्रपटावर काम करत असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. तसेच, गौरीसोबतच्या नात्याविषयी तो पुढील काळात आणखी खुलासा करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























