एक्स्प्लोर
'बुऱ्हाणपुरात मुघलांचा खजीना..'छावातील 'त्या' संवादानंतर एकच राळ उठली , टॉर्चच्या प्रकाशात शेतं डोंगरं खणून ठेवली, नक्की घडलं काय?, Photo
असीरगड गावात अफवा पसरल्यानंतर दूरदूरवरून लोक खणण्यासाठी आले. व्हिडिओमध्ये शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात खोदताना दिसत आहेत.
Burhanpur Treasure Chhava
1/7

"छावा" चित्रपटातला एक संवाद आठवतोय का? "बुऱ्हानपूरमध्ये मुघल साम्राज्याचा खजाना दडवण्यात आला होता...
2/7

आता याच बुऱ्हाणपुरात गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतात खड्डे खोदून ठेवल्याचं दिसून येतायत.
3/7

मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर जवळ असलेल्या असिर्गड किल्ल्या परिसरात नागरिक अनेक ठिकाणी शेतात खड्डे खोदून मुघल कालीन सोन्या चांदीची नाणी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येतंय.
4/7

असीरगडमध्ये ऐतिहासिक खजिना दडला असल्याची स्थानिक लोकांची धारणा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, लोक दूरदूरवरून खोदण्यासाठी येत आहेत.
5/7

गेल्या दोन ते तीन वर्षापासून या परिसरात हैदराबाद इंदूर या महामार्गाचे काम सुरू आहे साधारणतः तीन ते चार महिन्यापूर्वी या महामार्गाच्या पुलाच्या खोदकामादरम्यान काही सोन्या चांदीची नाणी सापडल्याची अफवा या परिसरात पसरली होती.
6/7

या महामार्गाची खोदकामाची माती संबंधित कंत्राट दाराने नजीक असलेल्या एका शेतात टाकली व या अफवेला बळ मिळालं ते छावा चित्रपटातील त्या संवादामुळे..
7/7

अन् बुऱ्हाणपुरातील किल्ल्याच्या परिसरात रात्रीच्या वेळी मुघल साम्राज्याचा खजीना शोधण्यासाठी स्थानिक हातात कुदळ फावडा घेऊन शेतात अन् डोंगराळ भागात खड्डे खोदत असल्याचं समोर येत आहे.
Published at : 09 Mar 2025 09:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























