एक्स्प्लोर
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
उष्माघातापासून वाचण्यासाठी सूती व सैल कपडे वापरणे, दुपारच्या वेळेस बाहेर न पडणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.
तापमानाचा उच्चांक होत असून कुठे कसे तापमान आहे? तपासा
1/9

राज्यात होळी दिवशी प्रचंड तापमानाची नोंद झाली असून चांगलीच रखरख वाढली आहे . नागरिकांना उन्हाचा चटका बसू लागलाय .
2/9

आज सोलापुरात 40.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली .सोलापूरच्या हवामान कार्यालयातून मिळालेला माहितीनुसार किमान तापमान हे वाढले असून 22.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली .
3/9

सध्या विदर्भ चांगलाच तापला आहे . बहुतांश ठिकाणी 38, -41 अंशांची नोंद होत आहे. विदर्भात अकोला नागपूर चंद्रपूरमध्ये 40 अंशांच्यावर तापमान नोंदवले गेले .
4/9

दुपारच्या सुमारास रस्त्यावरून फिरणे असहय होत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
5/9

या नकाशावरून आपल्या जिल्ह्यात किती कमाल तापमानाची आज (13 मार्च) नोंद झाली हे तपासता येईल. यात पांढऱ्या रंगातील जिल्हे हे सामान्य तापमानाहून कमी तापमान असल्याचे दर्शवतात.
6/9

राज्यात मध्य, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात कमाल तापमान कमालीचे वाढले आहे .
7/9

गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणपट्ट्यात तसेच मुंबई आजूबाजूच्या परिसरात उष्णतेची लाट होती.आता हिला विदर्भाकडे सरकली आहे.
8/9

हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भातील अकोला यवतमाळ अमरावती नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.
9/9

उत्तर व दक्षिण कोकणात 35 ते 39 अंश तापमानाची नोंद होणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 38 ते 40 पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे
Published at : 13 Mar 2025 06:43 PM (IST)
आणखी पाहा























