Gurgaon Restaurant : मोठी बातमी! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या; पाच जणांची प्रकृती बिघडली, दोन जण अत्यवस्थ
Dry Ice in Mouth Freshener : माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिल्याने पाच लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हरियाणाच्या गुरुग्राममधील धक्कादायक घटना समोर आली आहे.
![Gurgaon Restaurant : मोठी बातमी! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या; पाच जणांची प्रकृती बिघडली, दोन जण अत्यवस्थ Dry Ice in Mouth Freshener five people vomit blood at gurgaon restaurant after consuming dry ice contained mouth freshener marathi news Gurgaon Restaurant : मोठी बातमी! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या; पाच जणांची प्रकृती बिघडली, दोन जण अत्यवस्थ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/05/f7b54ee0c7d1698987f57e2241f5b36e1709620021729322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gurgaon News : हॉटेलमध्ये (Hotel) जेवणानंतर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) दिलं जातं. पण, ते खरंच माऊथ फ्रेशनर आहे का हे तपासून घ्यायला हवं. हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. या माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेमध्ये रेस्टॉरंटमध्ये लोकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. यामुळे पाच जणांची प्रकृती बिघडली. या पाच जणांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यातील दोन जण अत्यवस्थ आहेत.
माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर या लोकांची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे. गुरुग्रामच्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकास समोर आला आहे. अंकित कुमार नावाच्या व्यक्तीने रेस्टॉरंटविरोधात आरोप केले असून या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शनिवारी तीन जोडप्यांचा ग्रुप वाढदिवस साजरा करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्यांच्या जेवणानंतर, वेट्रेसने ग्रुपला माउथ फ्रेशनर ऑफर केले, परंतु त्याऐवजी त्यांना कोरड्या बर्फाचे दाणे दिले, ज्यामुळे त्यांची जीभ आणि टाळू खराब झाले, असे पोलिस आणि रेस्टॉरंटने सांगितले.
हरियाणाच्या गुडगावमधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणून सर्व्ह केलेल्या ड्राय आईस म्हणजे कोरड्या बर्फामुळे ग्राहकांच्या तोंडातून रक्त आलं. वाढदिवस साजरा करण्यासाठी वेट्रेसने ग्राहकांना चुकून ड्राय आईस दिल्याचं सांगितलं जात आहे.
वेट्रेसवर गुन्हा दाखल
गुडगावच्या सेक्टर 90 मधील एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणून देण्यात आलेल्या ड्राय आईसमुळे ग्राहकांच्या तोडांतू रक्त येऊ लागलं. याप्रकरणी विषबाधा करून नुकसान केल्याच्या आरोपाखाली वेट्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्राय आईस म्हणजे काय?
ड्राय आईस म्हणजे कोरड्या बर्फाचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये केला जातो. ड्राय आईस कार्बन डाय ऑक्साईडचे घनरूप आहे, जे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण ड्राय आईस वायू स्वरूपात रूपांतरित होतो.
पाहा व्हिडीओ : हाॅटेलमध्ये माऊथ फ्रेशनर ऐवजी ड्राय आईस दिला आणि तोंडातून रक्त आलं !
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Yavatmal : मद्यधुंद तीन युवतींचा बसस्थानकावर धिंगाणा, वाहतुक खोळंबली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)