एक्स्प्लोर
ऑडी कंपनीची नवी आलिशान कार भारतात लॉन्च, जाणून घ्या Audi RS Q8 कारचे फिचर्स काय? किंमत किती?
भालाफेकपटून नीरज चोप्रा याच्या उपस्थितीत ऑडीने कंपनीने आपली नवी कार भारतात लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत.

AUdi RS Q8 car launched in india
1/5

Audi RS Q8 : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात त्यांची नवीन उच्च-कार्यक्षम लक्झरी एसयूव्ही ऑडी आरएस क्यू८ च्या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्समध्ये उत्तम क्षमता आणि अत्याधुनिक लक्झरीचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्यामुळे ही कार अपवादात्मक क्षमता आणि आकर्षक डिझाइनसह परफॉर्मन्स एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन मापदंड स्थापित अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
2/5

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राच्या उपस्थितीत ऑडी इंडियाच्या नव्या आलिशान कारचं मुंबईत अनावरण करण्यात आलं. जानेवारी महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकून नुकताच फॅमिलीमॅन झालेला नीरजही या गाडीबद्दल भारावून बोलत होता. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या हस्ते अद्ययावत सोयींनी युक्त अशी 'ऑडी RS Q8 परफॉर्मन्स' भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली. 650 हॉर्स पॉवरचं शक्तिशाली इंजिन, 850 एनएनचा दमदार टॉर्क असल्यानं 0 ते 100 चा स्पीड ही एसयुव्ही कार 3.6 सेकंदात गाठू शकते.
3/5

23 इंचाचे अलॉय व्हिल्स आणि आपल्याला हवं तसं इंटिरिअर आणि खास 15 रंगात उपलब्ध असणाऱ्या या कारची भारतीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटी रूपये इतकी ठेवण्यात आलीय. नवीन Audi RS Q8 भारतात 2,49,00,000 रूपये (एक्स-शोरूम) या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. ही कार 10-वर्ष कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइडअसिस्टण्सच्या ओनरशीप फायद्यासह येते आणि आकर्षक सर्वसमावेशक मेन्टेनन्स व सर्व्हिस पॅकेजेसदेखील उपलब्ध आहेत.
4/5

या कारमध्ये अद्वितीय हाताळणी व नियंत्रणासाठी क्वॉट्रो पर्मनंट ऑल-व्हील ड्राइव्हसह स्पोर्ट डिफेन्शियल सुविधा आहे. अडाप्टिव्ह एअर सस्पेंशन, तसेच सानुकूल राइड अनुभवासाठी स्पोर्टसह अॅक्टिव्ह रोल स्टेबिलायझेशन आहे.या कारमध्ये सुधारित स्टॉपिंग पॉवरसाठी ब्ल्यू, रेड किंवा अॅन्थ्रासाइट ब्रेक कॅलिपर्ससह आरएस सिरॅमिक ब्रेक्स उपलब्ध आहेत.आरएस-स्पोर्ट एक्झॉस्ट सिस्टम आहे, डायनॅमिक टोन देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कारमध्ये वैयक्तिकृत आरामदायीपणासाठी पॉवर-अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह मेमरी फंक्शन आहे. ड्राइव्ह करताना अधिक लक्झरीसाठी फ्रण्ट सीट व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन आहे. प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्ट प्लससह ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टम आहे. सुरक्षित व युजर-अनुकूल एण्ट्री आणि एक्झिटसाठी पॉवर लॅचिंग डोअर्स आहेत. ऑप्शनल पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सुविधा देते
5/5

ड्राइव्ह करताना कनेक्टीव्हीटीसाठी ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. एक्स्टीरिअर मिरर्स, जे पॉवर-अॅडजस्टेबल, हीटेड असण्यासोबत इलेक्ट्रिकली फोल्ड करता येतात, तसेच अधिक सोयीसुविधेसाठी दोन्ही बाजूस ऑटो-डिमिंग आणि मेमरी फंक्शन आहे. लगेज कम्पार्टमेंट लिड आहे. कारमध्ये लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम आहे. प्रवाशांच्या संरक्षणासाठी सहा एअरबॅग्ज आहेत. गतीशीलपणे ड्रायव्हिंग करताना अधिक व्हेइकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आहे. लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवासाठी क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर आहे.
Published at : 17 Feb 2025 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion