Ladki Bahin :लाडकी बहीण योजनेतील झाडाझडती सुरु, मराठवाड्यातील 55 हजार महिलांचे 1500 रुपये बंद होणार
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मराठवाड्याती 55 हजार महिलांना आठव्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार नसल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या पाच लाखांनी घटलेली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील 55334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांच्या वतीन देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मराठवाड्यातील 54498 महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत.
मराठवाड्यातील 55334 महिलांचा लाभ बंद?
मराठवाड्यातील 55 हजार 334 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या महिलांना आतापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम मिळालेल आहे. अद्याप 54 हजार 598 अर्ज अजून मान्य करण्यात आलेले नाहीत.
मराठवाड्यात एकूण 21 लाख 97 हजार 211 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मराठवाडा विभागातून एकूण 23 लाख 7 हजार 184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले. 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत.
महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरु केली होती. डिसेंबरमध्ये राज्य सरकारनं 2 कोटी 46 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वाटप केले होते. तर, जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 कोटी 41 लाख महिलांना दिला गेला होता.म्हणजेच 5 लाख लाभार्थी महिला त्या महिन्यात कमी झाल्या होत्या. त्यामध्ये काही लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या होत्या हे समोर आलं होतं. याशिवाय काही महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांची संख्या कमी झाली. याशिवाय अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या किंवा चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला अर्जदारांची नावं कमी करण्यात आली होती.
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महिलांचं अनुदान बंद होणार?
मराठवाडा विभागात एकूण आठ जिल्हे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेडचा समावेश होते. यापैकी छत्रपती संभाजीनगरमधील 6655, धाराशिव 2533, लातूर 8001, जालना 9622, हिंगोली 5825, परभणी 2802,बीड 9364, नांदेड 10532 महिला अर्जदारांचा लाभ बंद होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला दिल्याची माहिती दिली.
इतर बातम्या :
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

