![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Yavatmal : मद्यधुंद तीन युवतींचा बसस्थानकावर धिंगाणा, वाहतुक खोळंबली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Yavatmal : मद्यधुंद तीन युवतीचा हा प्रकार जवळपास एक तास असाच सुरू होता. शेवटी पोलीस आल्यानंतर कळंब पोलीसांनी तीनही युवतीवर प्रतिबंधक कारवाई केली.
![Yavatmal : मद्यधुंद तीन युवतींचा बसस्थानकावर धिंगाणा, वाहतुक खोळंबली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल Maharashtra Yavatmal marathi news drunken girls at Kalamba bus station disrupted traffic the video went viral on social media. Yavatmal : मद्यधुंद तीन युवतींचा बसस्थानकावर धिंगाणा, वाहतुक खोळंबली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/03/56b2b0316dbc2e786d8d2fcbbcf6604a1709461669053381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Yavatmal : नशेच्या आहारी गेलेल्या यवतमाळच्या कळंब (Kalamb) येथील बस स्थानक परिसरात तीन मद्यधुंद युवतींनी चांगलाच धिंगाणा घातला. दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दोघांना विनाकारण मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
तीन मद्यधुंद युवतींचा धिंगाणा
नशेच्या आहारी गेलेल्या तीन तरुणी, रस्त्यावर मोठी वर्दळ, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आश्चर्याने भरलेल्या नजरा, हा प्रकार यवतमाळच्या कळंब बस स्थानक परिसरातील आहे. जिथे तीन मद्यधुंद युवतींनी चांगलाच धिंगाणा घातला. या तरुणी नशेच्या इतक्या आहारी गेल्या होत्या की रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होत्या, तसेच त्यांनी दोघांना विनाकारण मारहाण केली. तर या प्रकारामुळे रहदारीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांनी कळंब पोलीस ठाण्यात कळविल्यानंतरही एक तास कुणीच आले नाही. त्यामुळे जवळपास एक तास हा प्रकार असाच सुरू होता. शेवटी पोलीस आल्यानंतर कळंब पोलीसांनी तीनही युवतीवर प्रतिबंधक कारवाई केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
मद्यपी तरुणींचा भान विसरून रस्त्यातच गोंधळ
नशेच्या आहारी गेल्याने अनेकजण संकटांना आमंत्रित करतात. अनेकदा मद्यपी चालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने अपघात घडतात. तर काही मद्यपी भान विसरून रस्त्यातच गोंधळ घालतात. यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये तीन मद्यधुंद तरुणींनी भर रस्त्यातच चांगलाच राडा केला. रस्त्यावरील लोकांनी याचे व्हिडीओ बनवत तो व्हायरल केल्याने याची अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मद्यधुंद युवतींना बघणाऱ्यांची गर्दी
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील बसस्थानक परिसरात तीन मद्यधुंद युवतींनी राडा केला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरुणींनी रस्त्यावर धिंगाणा घालत एका तरुणाला बेदम मारहाण केली. नेमकं काय झालं हे बघणाऱ्यांची गर्दी झाली होती. याचवेळी त्या तरुणी येणाऱ्या जाणाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत होता. तसेच त्यातील दोघांना त्यांनी नशेत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ एकाने शूट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.
तीनही तरुणींवर पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या तीन तरुणींना ताब्यात घेत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघीही नशेत असल्याने कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर पोलिसांनी या तिघींनाही त्यांच्या भाषेत चांगलीच समज दिली. त्यानंतर त्यांनी नशेच्या आहारी जाऊन काय धिंगाणा घातला ते समजले. तरुणींनी मारहाण केलेल्या तरुणाच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी तीनही तरुणींवर कारवाई केली आहे.
हेही वाचा>>>
SSC Exam 2024 : अवघ्या दहा मिनिटातच दहावीचा पेपर सोशल मीडियावर झाला व्हायरल, मोबाइलधारकावर गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)