एक्स्प्लोर

"'ती' शेवटची 25 मिनिटं... महाराजांनी जे..."; 'छावा' पाहिल्यानंतर क्रांती रेडकरनं सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

Kranti Redkar Reaction On Chhaava: क्रांती रेडकरनं इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करून 'छावा' पाहिल्यानंतरचा आपला अनुभव शेअर केला आहे.

Kranti Redkar Reaction On Chhaava Movie: मराठी अभिनेत्री (Marathi Actor) क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. अनेकदा ते तिच्या चिमुकल्या जुळ्या मुलींबाबत असतात. ती त्यांचे गमतीशीर किस्से चाहत्यांसोबत शेअर करते. तर कधी एखाद्या घटनेवर भाष्य करणारे असतात. असाच एक व्हिडीओ क्रांती रेडकरनं शेअर केला आहे. यामध्ये क्रांती रेडकरनं विक्की कौशल अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.  या व्हिडीओमध्ये बोलताना क्रांतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच, विक्की कौशलवरही (Vicky Kaushal) क्रांतीनं कौतुकाचा वर्षाव केला आहे. विक्की कौशलने जे काम केलं आहे, ते इतकं स्तुत्य आहे... ते बघताना आपल्या अंगावर शहारा येतो, असं क्रांती व्हिडीओ शेअर करत म्हणाली आहे. 

क्रांती रेडकरनं इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये क्रांती म्हणते की, "माझे डोळे आताही सुजलेले दिसतायत. मी काल 'छावा' हा चित्रपट बघून आलीये. हा चित्रपट समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणीव करून देतो की, तुम्ही समाजात कुठे उभे राहत आहात? माझी अशी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे की, तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल, हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. हा एक खूप वेगळा अनुभव आहे."

"धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने जे काम केलं आहे, ते इतकं स्तुत्य आहे. इतकं सुंदर आहे. ते महाराज होते, ते राजे होतेच. ते बघताना आपल्या अंगावर शहारा येत असतो. त्यांची प्रत्येक हालचाल, त्यांची प्रत्येक नजर, त्यांची देहबोली, त्यांनी ज्या प्रकारे चित्रपट डब केलाय, मला वाटतं, तो मास्टर क्लास आहे. प्रत्येक नटासाठी सुद्धा. तसंच रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर बाकीच्या आपल्या सगळ्या मराठी कलाकारांनी जी साथ दिलीये, त्याच बरोबर सिनेमॅटोग्राफी, मेकेअप डिपार्टमेंटला तर साष्टांग दंडवत आहे.", असं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली आहे. 

"लक्ष्मण उतेकर तुमचं विशेष कौतूक. कारण तुम्ही एवढ्या धाडसी विषयाला हात घातला आणि तुम्ही इतक्या लीलया पार पडला. इतकं अप्रतिम सादरीकरण झालं. बऱ्याच वेळेला असं होतं की, सत्यघटनेवर काहीतरी करत असताना त्यातली भावना राहिली जाऊ शकते. ही सतत भीती सारखी असते. पण, तुम्ही एका क्षणालासुद्धा त्या भावना विसरलात नाहीत. एका आई-मुलांमधलं नातं असो, नवरा-बायकोमधलं नातं असू दे किंवा एका हिरो-खलनायक, ही प्रत्येक भावना तुम्ही जपली. या चित्रपटाचे शेवटची 25 मिनिटं जी आहेत, हे तुम्हाला असं जाणीव करून देतात की, माणूस म्हणून तुम्ही काय करताय? तुम्ही कसं जगताय? म्हणजे आपण चालताना जरी कोणाचा धक्का लागला तरी चिडणारे आपण किंवा बॉस बोलला म्हणून चिडणारे आपण, एवढ्याशा गोष्टींनी आपल्याला चिडायला होतं असेल. तर महाराजांनी जे आपल्यासाठी केलं, ज्या यातना, अपमान फक्त स्वराज्यासाठी भोगले. त्या 25 मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा...", असंही क्रांती रेडकर म्हणाली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

दरम्यान, 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्यानं देशभरात धुमाकूळ घातला आहे. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विक्की कौशल झळकला आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका बॉलिवूड स्टार अक्षय खन्नानं साकारली आहे. या चित्रपटानं रिलीज होताच अनेकांचे विक्रम मोडले. 'छावा' 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Embed widget