Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Torres Scam : टोरेस गैरव्यवहारातील टोळीने भारतातून पलायन केल्यानंतर बल्गेरिया या देशाला लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे.

Torres Scam : हजारो मुंबईकरांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणार्या टोरेस गैरव्यवहारातील (Torres Scam) आरोपींनी आता 'बल्गेरिया'मध्ये (Bulgaria) आपली दुकानं थाटल्याची माहिती समोर आली आहे. गुंतवणुकीवर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून तेथील लोकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात ही टोळी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टोरेस गैरव्यवहारातील आरोपींनी भारतानंतर आता बल्गेरियातील नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणुकीवर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून तेथील लोकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात ही टोळी आहे. मुंबईत या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे 12 हजार 783 लोकांनी तक्रार केली आहे.तर आतापर्यंत 130 कोटींचा चुना लावून आरोपी फरार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
टोरेस गैरव्यवहारातील आरोपींचं बल्गेरियावर लक्ष
मुंबईप्रमाणे बंगळूरू, सूरत, चेन्नई, कोलकाता येथे देखील टोरेसची कार्यालय उघडून फसवणूकीचा या टोळीचा डाव वेळीच उघडकीस आला आहे. या टोळीने भारतातून पलायन केल्यानंतर बल्गेरिया या देशाला लक्ष केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही स्वतंत्र गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात EOW पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. तर EOW पोलिसांनी या प्रकरणातील फरार युक्रेनियन आरोपींविरोधात आता 'ब्ल्यू कॉर्नर' नोटीस जारी केली आहे.
टोरेस घोटाळा नेमका कसा झाला?
मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. फेब्रुवारी 2024 मध्ये शोरूम सुरू करण्यात आले होते. ‘टोरेस’ने सुरुवातीला पूर्ण शहरात मोठे सेमिनार्स घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्यांचं आमिष दाखवून आकर्षित केलं. हळूहळू ‘टोरेस’नं गुंतवणुकीवरील व्याजदर परतावा वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे अधिकाधिक लोक योजनांमध्ये गुंतवणूक करू लागले. त्यांनी पैशांच्या स्वरूपात गुंतवणूक करण्यास लोकांना उद्युक्त केले. त्यातून आठवड्याला थेट 11 टक्के व्याजदर परतावा देण्याचे आश्वासन दिले. या माध्यमातून वर्षभर व्यवसाय करण्यात आला. मात्र, संधी मिळताच हजारो कोटी घेऊन आरोपींनी पोबारा केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

