एक्स्प्लोर

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?

RTO Rules For Vehicle Transfer From One State To Another : परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायच असेल किंवा इथलं वाहन दुसऱ्या राज्यात वापरायचं असेल तर आरटीओचे नियम काय आहेत? जाणून घ्या.

औरंगाबाद : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर आपली बदली झाली असेल किंवा काही कारणास्तव आपल्याला राज्य बदलायचं असेल आणि आपल्याकडे चार चाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर ते ज्या राज्यात आपण जात आहोत तिथे वापरता येतं का? जर वापरायचं असेल तर त्यासाठीचे काय नियम आहेत. इतर राज्यातून जर आपण गाडी खरेदी केली तर आपल्या राज्यात त्याची नोंदणी कशी करावी? त्यासाठीचे टॅक्सेस काय असतात? कुठले फॉर्म भरावे लागतात? हे ना असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर त्याची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र बाहेरील वाहन महाराष्ट्रात आणायचे असेल त्याच्या मध्ये दोन प्रकार पडतात. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात वाहन आणत असाल तर ते वाहन खाजगी स्वरूपाचे असेल तर तुम्ही अकरा महिने वेहिकल टॅक्स न भरता महाराष्ट्रात वापरू शकता. राज्यात प्रवेश करतेवेळी जो चेक पोस्ट असतो किंवा आरटीओ कार्यालय असते तिथे तुम्हाला तशी सूचना द्यावी लागेल. तिथे तुम्हाला एक अर्ज मिळेल तो भरून द्यावा लागेल. अशा वेळीव आपनास टॅक्स भरायची गरज नाही. गाडी जर कायमस्वरूपी या राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जात असाल किंवा पत्ता बदलाचा असेल. तुमचा मूळ नोंदणी ज्या आयटीओ कार्यालयात केली आहे. त्याच्याकडून तुम्हाला नमूना क्रमांक 28 मध्ये एनओसी घेऊन यावे लागते. पत्ता बदली करायचा असेल फॉर्म क्रमांक ते 30 मध्ये अर्ज करावा लागतो. तुमी गाडी बाहेर राज्यातील विकत घेत असेल, तर 28 नंबरमध्ये एनओसी लागते. यासाठी इतर फॉर्म लागतात. फॉर्म 29 आणि 30 वाहन हस्तांतरण करण्यासाठी मालक बदल करण्यासाठी हे अर्जाचे नमुने तुम्हाला भरून आरटीओ कार्यालयात जमा करावे लागतील. याबरोबरच नमूना क्रमांक 20 मध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो. या वाहनाला त्या ज्या राज्यात तुम्हाला घेऊन जायचे आहे ते राज्य तुमच्या वाहनाला नवीन नंबर देईल. त्यासाठी नवीन अर्ज भरावा लागतो. हे सगळं आपण ऑनलाइन करू शकतो. आरटीओच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता.

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?

इतर राज्यातून आलेल्या वाहनांची आरटीओ तपासणी कशी करते. बाहेर राज्यातून जेव्हा एखादी गाडी येते. या गाडीची आरटीओ कार्यालय तपासणी करते. त्या राज्यातील पोलिस खात्याकडून तेव्हा या चासी नंबरचे वाहन चोरीला गेले आहे का? याची खात्री केली जाते. व एक सर्टिफिकेट घेतले जाते. आणि एनओसीचे कन्फर्मेशन केले जाते. वाहनाची आपण तपासणी करतो म्हणजे की वाहन रोडवर आहे, त्या वाहनाची चासी नंबर तपासली जाते. वाहन चोरीचे आहे. याची तपासणी केली जाते. बऱ्याच राज्यात चोरी झालेली वाहने या राज्यात विक्रीला येतात. मग ती आपल्या राज्यात नोंद होऊ शकतात ती खबरदारी घेण्यासाठी आपण सगळी माहिती घेतो. पोलिस खात्याकडून आपण सगळा रिपोर्ट मागून घेतो. पोलीस खाते त्या वाहनाचा रिपोर्ट सादर करते या गाडी चोरी झालेली नाही.

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम?

इतर राज्यातून आलेल्या वाहनांना टॅक्स कसा भरावा लागेल आरटीओ ऑफिसकडून वाहन तपासल्यानंतर तुम्हाला नवीन नंबर दिला जातो. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा कर भरावा लागतो हा कर भरण्यासाठी वाहन किती जुने आहे, त्याप्रमाणे त्याचे टप्पे ठरलेले आहेत. तुमचं वाहन पेट्रोल, डिझेल की सीएनजी वाहन आहे हे देखील पाहिलं जातं. याप्रमाणे कर ठरला जातो. तो कर आपल्याला ऑनलाइन भरावा लागतो. खाजगी वाहनांच्या कराबाबत तुमच्या वाहनांच्या किमतीच्या अकरा किंवा वीस टक्के कर भरावा लागतो. हे वाहन किती जुने आहे यावरून ठरवेल जाते. ही सगळी प्रकिया पूर्ण करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा वेळ लागतो. प्रोसेस लांब आहे, पण सगळे रिपोर्ट बघून घेऊन नोंदणी करतो. अशी माहिती औरंगाबाद आरटीओ अधिकारी संजय मेहेत्रेवार यांनी दिली आहे.

राज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA) एखाद्या राज्यात नोंद असलेले वाहन एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी दुसऱ्या राज्यात न्यायचे अथवा वापरायचे असल्यास, अशा वाहनाची दुसऱ्या राज्यामध्ये नोंद करून नवीन नोंदणी क्रमांक घेणे आवश्यक आहे. असे करताना मूळ नोंदणी प्राधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि वित्त पुरवठादाराकडून सहमती घेणे गरजेचे आहे.

अर्ज कसे करावे?

  • नमूना 20, नमूना 26.
  • नमूना 33 पत्ता बदल असल्यास.
  • नमूना 29, नमूना 30 वाहन हस्तांतरण असल्यास.
  • नमूना FT, नमूना AT.
  • वित्तपुरवठादाराच्या संमतीसहमूळ नोंदणी प्राधिकाऱ्याकडून चेसिस प्रिंट जोडलेले नमूना 28 स्वरूपात ना हरकत प्रमाणपत्र.
  • नमूना TCA, TCR परिवहन संवर्गातील वाहनांसाठी.
  • प्रथम नोंदणी झाल्यापासून 30 महिन्यांच्या आत वाहन आणले असल्यास, प्रवेश कर भरल्याचा पुरावा.
  • सदर वाहन कुठल्याही अपघातात, गुन्ह्यात अथवा चोरी प्रकरणात सहभागी नसल्याबाबत वाहन मालकाचे प्रतिज्ञापत्र.
  • वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज - मूळ आरसी, विमा, पीयुसी
 WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोलेUddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणीUddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Embed widget