Cervical Health Awareness Month 2025 : निरोगी गर्भधारणेसाठी गर्भाशय निरोगी असणं गरजेचं; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलो करा 'या' टिप्स
Cervical Health Awareness Month 2025 : मातृत्वाचा प्रवास सुरु करण्यापूर्वी महिलांना गर्भाशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही खास टिप्स या लेखाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
Cervical Health Awareness Month 2025 : यशस्वी गर्भधारणेसाठी गर्भाशय आरोग्य चांगले आरोग्य (Health) राखणे आवश्यक आहे. मातृत्वाचा प्रवास सुरु करण्यापूर्वी महिलांना गर्भाशयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही खास टिप्स या लेखाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
या संदर्भात पुण्यातील अपोलो स्पेक्ट्राचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात, गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे 'Cervix' (सर्व्हिक्स) किंवा ग्रीवा. गर्भवती महिलेला प्रसूती होईपर्यंत बाळाला स्थिर आणि सुरक्षित राखण्यासाठी गर्भाशय ग्रीवा फायदेशीर ठरते. ठेवण्यासाठी जबाबदार असते. तुम्हाला माहिती आहे का? गर्भाशय ग्रीवा निरोगी असल्यास बाळाच्या योग्य विकासात मदत होते. अकाली जन्म किंवा गर्भपातासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत होते. बऱ्याच महिलांना गर्भाशय ग्रीवाच्या आरोग्याचे महत्त्व माहित नसते.
गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ग्रीवाच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 'या' टिप्स :
वेळोवेळी तपासणी : नियमित तपासणी ही तज्ञांना गर्भाशय ग्रीवाच्या समस्या जसे की संसर्ग, असामान्यता किंवा गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे बदल यांसारखी सुरुवातीची लक्षणे शोधण्यास मदत करते. वेळोवेळी तपासणी केल्याने कोणताही विलंब न करता योग्य प्रकारचे उपचार सुरू करण्यास मदत होईल.
सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे : हे सर्वज्ञात आहे की संभोगादरम्यान संरक्षण पर्यायाचा वापर करणे हे लैंगिक आरोग्य चांगले राखणे तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या संसर्गापासून दूर राहण्यास मदत करते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होऊ शकते.
वजन नियंत्रित राखणे : संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने गर्भाशयाच्या मुखावरील ताण कमी होतो आणि गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह टाळता येतो. तसेच, कोणत्याही गुंतागुंतीशिवाय महिलेस निरोगी गर्भधारणेचा अनुभव घेता येतो.
धूम्रपान टाळा : विविध अभ्यासांनुसार, धूम्रपान गर्भाशयाच्या मुखाला कमकुवत करते, ज्यामुळे अकाली प्रसुती आणि गर्भधारणेदरम्यानची गुंतागुंत वाढते. कोणत्याही अडचणीशिवाय गर्भधारणा होण्यासाठी महिलांनी धूम्रपानाची सवय सोडणे गरजेचे आहे.
तणावाचे व्यवस्थापन करा : तणाव हा संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतो, म्हणून गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दिर्घ श्वास घ्या. योगा किंवा ध्यानधारणा करा जेणेकरुन तुम्हाला तणावापासून दूर राहण्यास मदत होईल.
हायड्रेटेड रहा आणि पुरक आहाराचे सेवन करा : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड राखा. संतुलित आहाराचे सेवन करा जे तुमच्या शरीराला गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरेल.
डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा : जर तुम्हाला संसर्गाचे निदान झाले असेल, तर गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या महत्त्वाच्या टिप्सने महिलांना त्यांच्या गर्भाशयाच्या मुखाचे आरोग्य सुधारणे शक्य होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : स्वप्नात 'हे' प्राणी दिसणं म्हणजे सुखाची चाहूल; असे लोक असतात खूप भाग्यवान, रातोरात येते श्रीमंती
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )