Gopichand Padalkar on Jayant Patil : जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस, सत्तेशिवाय राहू शकत नाही, लाचार होण्याची तयारी; गोपीचंद पडळकरांची टीका
त्यांची इस्लामपूरपुरती ताकद मर्यादित राहिली आहे. तिथे सुद्धा लोकांनी त्यांना काठावर आणून ठेवलं. पुढीलवेळी सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर जरी लढले तरी त्यांचा पराभव होऊ शकतो, असे पडळकर म्हणाले.

Gopichand Padalkar on Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीचे मला काही विशेष वाटत नाही, जयंत पाटील हा काही लढावू माणूस नाही. वडिलांच्या रिक्त जागी आल्यामुळे संघर्ष आणि जयंत पाटील यांचा संबंध नसल्याची खोचक भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तेसाठी लाचार होण्याची त्यांची तयारी आहे. ते आता पूर्णपणे शरण आले आहेत हे लोकांनाही कळलं असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस
गोपीचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही. मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो जयंत पाटील फक्त अकरा हजार मतांनी निवडून आले. आता ती ताकद राहिली नाही. जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस असल्याचे ते म्हणाले. जयंतराव हा किरकोळ माणूस आहे, पण महाराष्ट्रातील आमच्या काही लोकांनाही हे अजून लक्षात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटलांच्या विरोधात सक्षमपणे कोण लढलं असतं तर 50 हजार मतांनी ते पडले असते, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस असून त्यांचा आता कुठेही प्रभावी गट राहिला नाही. त्यांची इस्लामपूरपुरती ताकद मर्यादित राहिली आहे. तिथे सुद्धा लोकांनी त्यांना काठावर आणून ठेवलं. पुढीलवेळी सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर जरी लढले तरी जयंत पाटील यांचा पराभव होऊ शकतो.
अजित पवार काय बोलले तुम्ही ऐकलं नाही
गोपीचंद पडळकर लाडकी बहीण योजनेवर बोलताना सांगितले की, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार काय बोलले तुम्ही ऐकलं नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विचार करूनच ही योजना आणली आहे. पुढे सुद्धा ही योजना सुरू राहील अशी भूमिका सरकारची आहे. विरोधी पक्ष सात हजार रुपये 9000 रुपये खटाखट देतो असं म्हणत होतं. मात्र, त्यांच्याकडे या योजनेबाबत नियोजन नाही. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विरोधकांनी ही योजना आणली मात्र बजेट पेक्षा जास्त पैसे त्यावर खर्च झाला. आपल्याकडे या योजनेसाठी फक्त सात टक्के खर्च होत आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहूनच ही योजना अंमलात आणली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























