(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : वजन कमी करण्यापासून ते कोलेस्ट्रॉलपर्यंत, जाणून घ्या दालचिनीचे पाणी पिण्याचे असंख्य फायदे
Health Tips : दालचिनीच्या पाण्याचे फायदे दालचिनीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
Health Tips : तुम्हाला प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात दालचिनी सहज सापडेल. अन्नाला चवदार आणि सुगंधी बनवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. या मसाल्याचा तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. जेवणात याचा वापर केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. लोह, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, तांबे, जस्त इत्यादी अनेक पोषक तत्व दालचिनीमध्ये आढळतात. दालचिनीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास असंख्य फायदे मिळू शकतात. दालचिनीचे पाणी आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे या संदर्भात अधिका माहिती जाणून घेऊयात.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त
मासिक पाळीत महिलांना वेदना, जळजळ इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीचे पाणी पिऊ शकता. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला आराम मिळेल.
वजन कमी करण्यास उपयुक्त
दालचिनीमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकय क्षमता कमी करण्याची क्षमता आहे, यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. दालचिनीचे पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित राहते, त्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता.
मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांच्यासाठी दालचिनी एक औषध म्हणून काम करते. दालचिनीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारते.
प्रतिकारशक्ती वाढवते
दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. तुम्ही दालचिनीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास ते तुमच्या शरीराला संसर्ग आणि आजारांशी लढण्यास मदत करू शकते.
पचनास मदत करते
पचनाशी संबंधित समस्या असलेल्यांसाठी दालचिनीचे पाणी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते.
हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते
दालचिनीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दालचिनीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
अशा प्रकारे तुम्ही नियमितपणे दालचिनीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमचे अनेक आजार दूर होतील. तसेच, तुमचे आरोग्य निरोगी राहण्यासही मदत होईल. याकरता आठवड्यातून 2-3 वेळा दालचिनीच्या पाण्याचे सेवन करणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.