Bird Flu in Nagpur : बर्ड फ्लूने एकच खळबळ, नागपुरातील हजारो कोंबड्या अन् खाद्य केल नष्ट; प्रशासन सतर्क
नागपुरातील तीन कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील हजारो कोंबड्या नियमानुसार मारून जमिनीत पूरल्या आहेत.

Bird Flu in Nagpur : नागपूर शहरातून बर्ड फ्लू (Bird Flu) संदर्भात एक मोठी माहिती पुढे आली आहे. शहरातील ताजबाग येथील यासीन प्लॉट परिसरात तीन कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लू मुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या नियमानुसार मारून जमिनीत पूरल्या आहेत. तर त्यांचे एक हजार किलो पेक्षा जास्त खाद्यही नष्ट केले आहे. दुसरीकडे बर्ड फ्लुमुळे (Bird Flu in Nagpur) मृत्यू पावलेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्यांना Tamiflu च्या औषधी दिल्या जात आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, ताजबाग परिसरातील यासीन प्लॉट भागात एका चिकन सेंटर मधील तीन कोंबड्यांचा 31 जानेवारी रोजी अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर बर्ड फ्लूच्या संशयाने पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. दोन दिवसापूर्वी तिथून आलेल्या अहवालात ताजबाग परिसरातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते.
परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या मारल्या
त्यानंतर नियमानुसार पशुसंवर्धन विभागाने यासीन प्लॉटच्या अवतीभवतीचा एक किलोमीटर चा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बर्ड फ्लू च्या नियमानुसार त्या परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या मारल्या आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण केलंय. मात्र नागपूर शहरातून बर्ड फ्लूचा (Bird Flu) शहरात शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन नागपुरात
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर मुख्यालयात 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी दुसरे अधिवेशन होणार आहे. 24 मार्चला दुपारनंतर खुले अधिवेशन होणार असून 120 तालुक्यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी या अधिवेशनाला हजार राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न, अनुशेष यावर चर्चा तसेच विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी सर्व पार्श्वभुमी, सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक मांडणार आहेत. प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले विदर्भाचा अर्थसंकल्प सादर करून जनते समोर मांडणार असल्याची माहितीही पुढे आले आहे. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

