The Mehta Boys Review : बापलेकाच्या नात्याची कहाणी, वडिलांसोबत आवर्जुन पाहावा असा 'द मेहता बॉयज'
The Mehta Boys Review : 'द मेहता बॉयज' हा दमदार चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. बापलेकाच्या नात्यावरील या सिनेमाला रिव्ह्यू वाचा.

बोमन इराणी
बोमन इराणी, अविनाश तिवारी
Amazon Prime Video
The Mehta Boys Review : मुलगा आणि वडील यांच्यातील नातं खूप सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मुला वडिलांसोबत एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. आलिशाम रेस्टॉरंट असल्यामुळे मुलगा लपून-छपून वेटरला त्याचं क्रेडिट कार्ड देतो आणि त्या कार्डमधून बिलाचे पैसे कापण्यास सांगतो आणि बिल कमी पैशांचं बनवण्यास सांगतो. कारण, वडिलांना कळलं की, हे रेस्टॉरंट इतकं महागडं आहे, तर त्यांना ते आवडणार नाही.
आपणही अनेक वेळा असंच करतो ना? एखादी महागडी वस्तू आणतो आणि ती आई-वडिलांना स्वस्त असल्याचं सांगतो. कारण, त्यांना वाटू नये की, आपण पैसे वाया घालवतोय. हा चित्रपट वडील आणि मुलामधील नातं दाखवण्याचं काम करतो. चित्रपटातील एक महत्त्वाची भूमिका साकारण्यासोबतच बोमन इराणी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे.
कथा
ही कथा वडील बोमन इराणी आणि मुलगा अविनाश तिवारी यांच्याभोवती फिरते. दोघांमध्ये आपापसांत जमत नाही, का? ही गोष्ट कथेत समजली नाही, पण वडील मुलाला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वडील हँडब्रेकवर हात ठेवून गाडी चालवत आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारी असलेल्या सीटवर बसला आहे आणि मुलाला समजत नाही की, त्यांचे वडील असं का करतात.
मुलगा आर्किटेक्ट आहे पण, तिथेही काहीही करू शकत नाही. या दोघांची गाडी आयुष्यात कुठेतरी अडकली आहे. आईच्या मृत्यूनंतर अशी परिस्थिती येते की, वडील आणि मुलाला एकत्र राहावं लागतं. दोन वेगवेगळे स्वभाव असलेले वडील आणि मुलगा एकत्र राहतात, तेव्हा काय-काय होतं, हे तुम्हाला हा चित्रपट पाहूनच कळेल.
चित्रपट कसा आहे?
हा एक चित्रपट चांगला असून तुम्हाला वडील आणि मुलामधील नातं नव्याने समजून घेण्यास मदत करतो. यामुळे आपल्याला हे जाणवतं की, आपले पालक जरी वृद्ध झाले असले, तरी त्यांना जीवनाचा खूप अनुभव आहे आणि आपण या अनुभवातून नक्कीच शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चित्रपटातील अनेक दृश्ये तुमच्या हृदयाला स्पर्श करतात.
यामध्ये अनेक दृश्य अशी आहेत, जी समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा विचार करावा लागेल आणि काही गोष्टी तुम्हाला समजणारही नाहीत, तरीही हा चित्रपट तुम्हाला योग्य तो अनुभव देण्यात यशस्वी ठरतो. यातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय उत्तम आहे, हेच या चित्रपटातील काही कमतरतांकडे दुर्लक्ष करण्याचं महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही तुमच्या वडिलांसोबत हा चित्रपट नक्की पहा, यामुळे तुमच्या दोघांमधील नातं अधिक घट्ट होईल.
अभिनय
बोमन इराणी या चित्रपटाचा आत्मा आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांनी अद्भुत अभिनय कौशल्य दाखवलं आहे. दमदार अभिनयामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांचे चाहते व्हाल. पत्नीशी बोलणे असो, मुलाच्या खास मित्राला भेटणे असो, प्रेम दाखवणे असो किंवा राग दाखवणे असो, तो प्रत्येक भावना त्यांनी अभिनयातून उत्तमरित्या मांडली आहे. त्यांचा अभिनय हा चित्रपट पाहण्याचं सर्वात मोठं कारण आहे.
अविनाश तिवारी हा एक दमदार अभिनेता म्हणून उदयास येत आहे. त्याचं अभिनय कौशल्य यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्यानेही दमदार अभिनय केला आहे. बोमन इराणीसोबत त्याची केमिस्ट्री अद्भुत आहे. त्याचे भाव, शेवटी त्याचा एकपात्री प्रयोग, सर्वकाही विलक्षण आहे. श्रेया चौधरीचे कामही खूप चांगलं आहे. बोमनसोबतचे तिचे सीन्स अप्रतिम आहेत. पूजा सरूपची भूमिका छोटी पण प्रभावशाली आहे.
दिग्दर्शन
बोमन इराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे असून त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट त्यांचा दिग्दर्शक म्हणून डेब्यू आहे. त्याच्या अभिनयाप्रमाणे दिग्दर्शनातही तिच अद्भुत प्रतिभा दिसून येते.
त्यांच्या स्वतःच्या अभिनयाने या चित्रपटाला चारचांद लावले आहेत. काही ठिकाणी त्यांनी गोष्टी सोप्या करायला हव्या होत्या, कारण भारतीय कुटुंबांमध्ये आपल्याला कधी-कधी आपापसातील साध्या भावना देखील समजून घेणं कठीण जाते, पण बोमन यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे.
तुम्ही तुमच्या वडिलांसोबत हा चित्रपट नक्कीच पाहा.
रेटिंग - 3 स्टार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

