Accident : महाकुंभसाठी चाललेल्या 8 दोस्तांचा दुर्दैवी अंत, धावत्या बसचा टायर फुटला, दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या कारवर आदळली; सर्वांनी जागीच प्राण सोडला
Accident : मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहणारे सर्व लोक महाकुंभासाठी भिलवाडाहून प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे जात होते.

Accident : महाकुंभला जात असताना धावत्या बसचा टायर फुटल्यामुळे बस दुभाजकावर पलटी मारून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारवर आदळल्याने कारमधील 8 जणांचा जागीच अंत झाला. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर मौखमपुरात हा अपघात काल गुरुवारी दुपारी झाला. या भीषण अपघातात इको कारचा चक्काचूर झाला. आत बसलेल्या आठही जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भिलवाडा येथील रहिवासी होते. एसपी आनंद कुमार शर्मा म्हणाले की,जोधपूर डेपोची रोडवेज बस जयपूरहून अजमेरला जात होती. इको कार अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होती. यावेळी अचानक बसचा टायर फुटला. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटले. बस दुभाजकावरून पलटी होऊन मारून पलीकडून येणाऱ्या कारला धडकली.
सर्व मित्र महाकुंभला जात होते
या भीषण अपघातात दिनेश कुमार, सुरेश रेगर, बबलू मेवाडा, जानकीलाल, रविकांत मदनलाल, मुकेश उर्फ बाबू रेगर मुलगा मदनलाल, नारायणलाल बैरवा आणि प्रमोद सुथार यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहणारे सर्व लोक महाकुंभासाठी भिलवाडाहून प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे जात होते.
सकाळी घरून निघाले, तीन दिवसांनी परतणार होते
बडलियास गावचे माजी सरपंच प्रकाश रेगर म्हणाले की, सर्व तरुण मित्र होते. गुरूवारी सकाळी 10:30 वाजता बादलियास (भिलवाडा) येथून प्रयागराज महाकुंभासाठी रवानाळ झाले होते. तीन दिवसांनी गावी परतणार होते. बबलू मेवाडा हे मांडलगड रेल्वे दूरसंचार विभागात नियुक्त होते. काही काळापूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. बबल यांना तीन मुली आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आलेली नाही. मृतदेह घेण्यासाठी गावातील काही लोक कुटुंबासह जयपूरला रवाना झाले आहेत. आज शुक्रवारी दुपारपर्यंत सर्वांचे मृतदेह गावात पोहोचतील. प्रकाश रेगर यांनी सांगितले की, आमच्या गावातील पाच जण होते. सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 21 लाख रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी, तरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी आमची मागणी आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले, टायर फुटल्याने बस दुभाजकावरून ओलांडून दुसऱ्या बाजूला
प्रत्यक्षदर्शी इसाक खान आणि प्रल्हाद यांनी सांगितले की, जोधपूर डेपोची बस जयपूरकडून येत होती. बसचा ड्रायव्हर साईडचा पुढचा टायर फुटला, त्यामुळे बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली. मोटारीत अडकलेले मृतदेह मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या























