Uddhav Thackeray Mumbai Speech : कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली,उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा
Uddhav Thackeray Mumbai Speech : कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली,उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा
मागे मी रेल्वेच्या कार्यक्रमाला दोन वेळा आलो होतो.. आजही परत आलोय.. मी पुन्हा येईन असं नाही म्हणणार.. पण नेहमी येत राहीन - वाजपेयी यांचंही अभिनंदन त्या वाजपेयी आणि या वाजपेयी यांच्याशी जवळचे संबध - आपल्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी, काही द्या काही नका देऊत काम करायला आपण तयार - हल्ली रिझर्वेशन देऊनही अनेकजणं डब्बे बदलतात - तुमची वाटचाल योग्य रुळावर आहे - ज्यांना उदीष्ठ नाही त्यांच्या गाड्या भरकटतात - कसलीही अपेक्षा न करता आपण सर्व भगव्याचे पाईक आपण आहात तो पर्यंत चिंता नाही - मी काही विचार सोडलेले नाहीत. भगवा हा हातातून कधापी सुटणार नाही - काल अर्थसंकल्प झाला रेल्वेचाही अर्थसंकल्प त्यातच घेतला - कोकणलाही भारतीय रेलमद्ये घ्या ही मागणी फार पूर्वीची मात्र सध्या सर्व काही मेरी मर्जी प्रमाणे सुरू आहे - न्याय हक्कासाठी आंदोलन करावी लागतात. - आपण संयमी आहोत म्हणजे आम्ही भेदरट आहोत असे नाही - दिल्लीत बसलेले फक्त दिल्लीपूरतं बघता - गोरखपूरला कशी न्ह्यायची तशी न्ह्या मात्र आमची कोकण रेल्वे वळवून का? - इतर ठिकाणच्या गाड्या व्यवस्थित सुरू आहेत - मुंबई गोवा रस्ता असा करेन की खड्डा पडणार नाही असं गडकरी बोलले होते - मात्र रस्ता झाला का ? वाटेल ते सांगतात - छ महाराज याच्या नावाने टर्मिनल आहे पण पुतळा कधी उभारणार - कोण लावणार, कसा लावणार.. त्याला प्रोटोकॉल नाहीये - विनायकजी त्यांना सांग या तारखेपर्यंत पुतळा लावा नाही तर आम्ही तिथे पुतळा उभारू - यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यांना ईव्हीएम मशीन वाटतं - रेल्वे कर्मचार्यांवरच्या ताण तणावा बाबत कोण रेल्वे मंत्री किंवा अधिकारी येत आहेत - चूकीचं समर्थन नाही. आपल्या हातात अनेकांचे जीव आहेत - नागरिकांच्या जीवाची हमी कर्मचारी घेत असतील तर कर्मचार्यांचीही हमी घ्यायला हवी - जुन्या पेन्शनचा मुद्दा माझा अहवालात आहे - आमची सत्ता आली की आम्ही जुनी पेन्शन योजन लागू करणार - कोरोना काळातही आपण काम करून दाखवलं आहे ही आपली ओळख आहे - हे सरकार किंवा निवडणूकीचा निकाल असा लागूच शकत नाही - एसटीची वाट लागली आहे. -- राज्यात एसटीतोट्यात आहे बेस्टची वाट लागलेली आहे रेल्वे राहिल का ? - पालिका ही सर्वाच श्रीमंत होती ती आता राहिली नाही - ९२हजारांच्या मुदत ठेवी आता ८० हजार कोटीवर आली आहे - अडीच लाखांची देणी करून ठेवली आहे - मुंबई महापालिकेवर इतकी देणी करून ठेवली आहे की पुढची २३ वर्ष ती चुकवावी लागणारआहेत - निवडणूकीच बटेंगे तो कटेंगेचानारा देतात, आणि युनियन फोडतात - आपल्या प्रत्येकाच्या निष्ठेची दखल मी घेतलेली आहे - हल्ली एक झालयं देता की जातो असे म्हणणारे होते देऊनही ते गेलेच - न्याय हककासाठी स्थापन केलेली हीशिवसेना आहे - शिवसेना आणि संघर्ष हे एक वेगळं नातं आहे त्या शिवाय ते नातं पूर्ण होऊ शकत नाही. ------------- कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली, अशीच सूरतची ट्रेन पाटण्याला वळवली का? तसेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते आताचा जमाना असा आहे, की पक्षात येण्यापूर्वी आरक्षण पाहिजे. आरक्षण असेल तर लोक पक्षात येतात. आणि जरा कुठे खुट झालं तर आरक्षण दिलेलं असलं तरी लोकं डबे बदलतात, गाड्या बदलतात. पण त्यातले तुम्ही नाही. मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. रेल्वे कामगार म्हणजे एकच रूळ आहे आणि त्या रुळावरून तुमची योग्य वाटचाल सुरू आहे, ज्यांना उद्दिष्टाचं रुळ नाही हेतू नाही ते भरकटत आहेत. कथी या फलाटावर कधी त्या फलाटावर, त्यांना समाधान काहीच नाही. पण तुमच्यासारखे कट्टर आणि कडवट कार्यकर्ते आहेत ते कसलीही अपेक्षा न करता, केवळ आणि केवळ भगव्याचे पाईक, काहीही होवो माझा भगवा मी नाही सोडणार. आणि हे सगळे तुम्ही भगव्याचे पाईक तुम्ही सर्व आहात, तोपर्यंत मला चिंता नाही. काही लोक म्हणतात की आम्ही विचार सोडले, आम्ही विचार कधीही सोडलेले नाहीत. हातात जो भगवा घेतला आहे ते सतीचं वाण आहे. एक वसा म्हणून घेतलेला आहे. तो भगवा हातातून सुटणं कदापि शक्य नाही.






















