एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात सदावर्ते ढाराढूर झोपले, कोंबडा आरवला, बाकीचेही थकले, पण...

Gunaratna Sadavarte : बिग बॉसच्या घरात सदावर्तेंसाठी पहिल्याच दिवशी कोंबडा आरवला आहे.

Gunaratna Sadavarte in Bigg Boss 18 :  बिग बॉसच्या 18व्या (Bigg Boss 18) सीझनमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एन्ट्री केली आहे. त्यांच्या विशेष डायलॉगमुळे तर कधी त्यांच्या विविध मागण्यांमुळे गुणरत्न सदावर्ते हे नाव कायमच चर्चेत असतं. पण आता हे नाव बिग बॉसमुळे चर्चेत राहणार आहे. सदावर्तेंनी हटके एन्ट्री घेतल्यानंतर आता पहिल्याच दिवशी त्यांच्यामुळे घरातील सदस्यांनाही त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. 

बिग बॉसच्या घरात झोपण्यास सक्त मनाई असते. जोपर्यंत घरातले लाईट्स सुरु असतात, तोपर्यंत घरातले सदस्य झोपू शकत नाहीत. जर कोणता सदस्य झोपलाच तर त्याच्यासाठी घरात कोंबडा आरवला जातो. नेमका हाच प्रकार गुणरत्न सदावर्तेंसोबत पहिल्याच दिवशी घडलाय. 

गुणरत्न सदावर्ते पहिल्याच दिवशी डाराडूर झोपले

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये घरात कोंबडा आरवत असतानाही गुणरत्न सदावर्ते हे डाराडूर झोपले असल्याचं पाहायला मिळतंय. घरातले इतर सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण तरीही सदावर्ते काही केल्या उठत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे पहिल्याच दिवशी गुणरत्न सदावर्तेंसाठी घरातला कोंबडा आरवलाय आणि इतर स्पर्धकांना मनस्ताप भोगावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय.                                                                                

गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात

बिग बॉस हिंदीचा 18 वा सीजन सुरू झाला असून सलमान खान त्याचा होस्ट आहे. या शोमध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते पोहोचले. त्यांची एन्ट्रीही एकदम डॅशिंग होती. सदावर्ते आल्यानंतर सलमान खानने त्यांची ओळख ही महाराष्ट्रातली एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून करून दिली. त्यानंतर सदावर्तेंनी बिग बॉसमधील आणखी एक कन्टेस्टंट असलेली आयेशा सिंहसोबत ओळख करून घेतली.'ना पेशी होगी, ना गवाही होगी. तुम हमारे क्लाएंट बनेगो, जो हुज्जत होगई, होगी वो खतम होगी' असा डॉयलॉग त्यांनी मारला.  

ही बातमी वाचा : 

Gunratna Sadavarte : डंके की चोट पे, ना पेशी होगी, ना गवाही होगी; गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये डॅशिंग एन्ट्री अन् सलमानही झाला अवाक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंतीHaryana Election Results 2024 : हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget