Gunratna Sadavarte : डंके की चोट पे, ना पेशी होगी, ना गवाही होगी; गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये डॅशिंग एन्ट्री अन् सलमानही झाला अवाक
Bigg Boss 18 : 'माझे नाव आधी पोहोचतं, नंतर आवाज पोहोचतो' अशी ओळख अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी करून दिली आणि सलमान खानही खळखळून हसला.
मुंबई : ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच नावाची चर्चा... अशी काही परिस्थिती झाली ज्या वेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते हे हिंदी बिग बॉसच्या घरात पोहोचले. 'ना पेशी होगी, ना गवाही होगी' असा डॉयलॉग सदावर्तेंनी मारला. 'डंके की चोट पे हम सदावर्ते है' असं सांगत त्यांनी आपली ओळख करून दिली. ज्यावेळी सलमान म्हणाला की, सदावर्तेंना संपूर्ण देश ओळखतो, त्यावेळी सदावर्तेंनी आणखी एक डॉयलॉग मारला. 'माझे नाव आधी पोहोचते, मग आवाज पोहोचतो' असं हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं आणि शोचा होस्ट सलमान खान खळखळून हसायला लागला.
बिग बॉस हिंदीचा 18 वा सीजन सुरू झाला असून सलमान खान त्याचा होस्ट आहे. या शोमध्ये नावाजलेले व्यक्तिमत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते पोहोचले. त्यांची एन्ट्रीही एकदम डॅशिंग होती. सदावर्ते आल्यानंतर सलमान खानने त्यांची ओळख ही महाराष्ट्रातली एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून करून दिली. त्यानंतर सदावर्तेंनी बिग बॉसमधील आणखी एक कन्टेस्टंट असलेली आयेशा सिंहसोबत ओळख करून घेतली.'ना पेशी होगी, ना गवाही होगी. तुम हमारे क्लाएंट बनेगो, जो हुज्जत होगई, होगी वो खतम होगी' असा डॉयलॉग त्यांनी मारला.
सलमान खान काय म्हणाला सदावर्तेंच्या बद्दल?
गुणरत्न सदावर्तेंची ओळख करून देताना सलमान खान म्हणाला की, या व्यक्तीचे सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. संपूर्ण देशात यांचा आवाज पोहोचला आहे. यांच्याकडील ज्ञानाचा सर्वांना फायदा होईल.
डंके की चोट पे
सदावर्तेंचा गाजलेला डॉयलॉग म्हणजे डंके की चोट पे. बिग बॉसमध्येही पोहोचल्यावर ते म्हणाले की, डंके की चोट पे हम सदावर्ते है. राजे रजवाडे कें उपर हम 'वरते' होते है. आईने डॉक्टर व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. म्हणून मी डेन्टल डॉक्टर झालो. वडील म्हणाले लुटमारीचा धंदा कायम राहावा, म्हणून मग वकील झालो. आता सलमान खान सोबत आलो आणि अॅक्टर झालो.
हा गेम म्हणजे ब्रेन गेम आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. ये पब्लिक है ये सब जानते है असं म्हणत सदावर्ते त्यांच्या स्टाईलमध्ये हसले.
ही बातमी वाचा: