एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा राजकारणात प्रवेश! पोस्ट शेअर करत म्हणाली, स्वप्न पूर्ण झाले..

कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Ashwini Mahangade: आई कुठे काय करते, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं आता राजकाणात प्रवेश केला आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचं बिगूल वाजलं आहे. राजकीय हलचालींना एकीकडे वेग आलेला असताना आई कुठे काय करते मालिकेतील अनघानं म्हणजेच अश्विनी महांगडे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. याविषयी तिने सोशल मिडियावर पोस्ट करत पक्षप्रवेशाची बातमी जाहीर केली आहे.

शरद पवार गटात प्रवेश

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. दरम्यान, अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे हिनं राजकारणात प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात तिनं हा पक्षप्रवेश केला आहे. तिच्या पक्षप्रवेशाच्या वेळी खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते.

वडिलांची आठवण काढत केली सोशल मिडिया पोस्ट

राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताना अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी वडिलांची आठवण काढत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिच्या वडिलांनीही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम केल्याचं तिनं यात म्हटलंय.

View this post on Instagram
 
A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

काय म्हणलंय तिनं पोस्टमध्ये?

माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.
पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार यांनी #महाराष्ट्र_प्रदेश_नॅशनॅलिस्ट_महिला_काँग्रेस_पार्टी_-_शरदचंद्र_पवार_पार्टीच्या #उपाध्यक्ष_पदी_नियुक्ती_केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे.
मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे,
मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.

#ashvini_mahandage
#राजकारणातून_घडेल_समाजकार्य

नेटकऱ्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

यावर नेटकऱ्यांनी अश्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.  चांगल्या लोकांची राजकारणात गरज असल्याचं काहींनी म्हणलंय तर अनेकांनी संभाजी महाराज आणि राणु अक्का साहेब यांना पुन्हा एकत्र पाहून खूप आनंद झाला असंही अनेकांनी लिहिलंय. पुढील राजकीय वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब, अरे वाह खूप खूप अभिनंदन...अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना नेटकऱ्यांनी दिल्यात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget