Rakul Preet Birthday : नॅशनल गोल्फ प्लेअर ते बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, रकुल प्रीत सिंहबद्दल 'या' खास गोष्टी माहितीयत?
Happy Birthday Rakul Preet : रकुल प्रीत सिंह सिनेसृष्टीत येण्याआधी राष्ट्रीय गोल्फ खेळाडू होती, हे फार कमी जणांना माहित आहे. वाढदिवसानिमित्त रकुल प्रीत सिंहबद्दल खास गोष्टी जाणून घ्या.
Rakul Preet Singh Career : बॉलिवडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नाव रकुल प्रीत सिंह. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा आज 10 ऑक्टोबर रोजी 34 वा वाढदिवस आहे. सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर रकुलने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. रकुल प्रीतने बॉलिवूडसह तेलगू, तमिळ, कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रकुल प्रीत सिंह सिनेसृष्टीत येण्याआधी राष्ट्रीय गोल्फ खेळाडू होती, हे फार कमी जणांना माहित आहे. रकुल प्रीत सिंहच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या.
पॉकेट मनीसाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. रकुल प्रीत भारतीय सैन्यातील अधिकारी कुलविंदर सिंह आणि राजिंदर कौर यांची मुलगी. रकुल प्रीतने आर्मी पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले.
रकुल प्रीत आता बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
रकुल प्रीतला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. याशिवाय तिने कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगलाही सुरुवात केली होती. ती खेळामध्येही खूप सक्रीय होती. रकुल तिच्या कॉलेजच्या दिवसात राष्ट्रीय स्तरावरील गोल्फ खेळाडू होती. पण अभिनय आणि मॉडेलिंगमधील आवडीमुळे तिने खेळापासून फारकत घेतली.
अवघ्या 18 व्या वर्षी पहिला चित्रपट
रकुल प्रीतने कॉलेज पूर्ण झाल्यावर अवघ्या 18 व्या वर्षी पहिला चित्रपट साईन केला होता. पण, चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय तिने प्रसिद्धीसाठी नाही, तर पॉकेट मनी मिळवण्यासाठी घेतला होता. कॉलेजमध्ये असताना रकुलने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनयात रस असल्याने पॉकेट मनीसाटी पैसे मिळावे, या हेतूने तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2009 मध्ये तिने 'गिल्ली' चित्रपटामधून अभिनयाला सुरुवात केली.
View this post on Instagram
रकुल प्रीत सिंहची अभिनय कारकीर्द
रकुल प्रीत सिंहने 2009 मध्ये कन्नड चित्रपट 'गिल्ली'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं. दोन वर्षांनंतर 2011 मध्ये रकुलने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. पण, या स्पर्धेत तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण, या स्पर्धेमुळे रकुलला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि शेवटी अभिनेत्रीने दिव्या खोसलाच्या 2014 मध्ये आलेल्या 'यारियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :