एक्स्प्लोर

कॉमेडियन समय रैनाच्या अडचणी आणखी वाढल्या, न्यायालयाने 'इंडियाज गॉट लेटेन्ट'बाबत घेतला मोठा निर्णय!

कॉमेडियन समय रैना याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्याची एक याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता त्याला थेट न्यायालयात हजर राहणे गरजेचे आहे.

Samay Raina And India's Got Talent : गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन समय रैना (Samay Raina) हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावर देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे. या कार्यक्रमातील एका शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या विधानानंतर हा वाद उफाळला होता. दरम्यान, आता समय रैना, या शोच्या परीक्षकांमध्ये उपस्थित असलेले प्रसिद्ध चेहरे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. असे असतानाच आता समय रैनाला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे, त्याची ऑनलाईन पद्धतीने समन्सला उपस्थित राहण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. 

न्यायालयाचा नेमका निर्णय काय? 

 इंडियाज गॉट लेटेन्ट हा कार्यक्रमाबाबत सध्या कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दाखल गुन्ह्यानुसार सध्या मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकरणाशी निगडित असलेल्यांना मुंबई पोलिसांनी सन्मस बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. समय रैना यालादेखील समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्याने काही कारणास्तव प्रत्यक्षपणे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही असे सांगत ऑनलाईन पद्धतीने या सुनावणीला उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता समय रैना याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहूनच जबाब नोंदवावा लागणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे समय रैना याला एका प्रकारचा धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. 

30 ते 40 जणांना नोटीस 

मिळालेल्या माहितीनुसार इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावीरल आक्षेपाप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले आहेत.या प्रकरणाशी  संबंधित एकूण 30 ते 40 जणांना महाराषट्ट्र सायबर पोलिसांनी समन्स बजावले आहे. समय रैना मात्र या समन्सनुसार कार्यक्रमांना उपस्थित राहिलेला नाही. समन्स बजावून जर का या गुन्ह्याशी संबधित व्यकती चौकशीला गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे समय रैनावरही पुढची कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता पर्यंत रघुराम, देवेश दिक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला आहे.  

नेमका वाद काय आहे? 

समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेन्ट हा कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध आहे. समय रैना यूट्यूबवर या कार्यक्रमाचे वेगवेगळे शो यूट्यूब चॅनेलवर अपलोड करतो. काही दिवसांपूर्वी असाच एक शो समयने यूट्यूबवर अपलोड केला होता. या कार्यक्रमात परीक्षकांच्या पॅनेलमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया उपस्थित होता. त्याने या शोमध्ये पालकांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर समय रैना, रणवीर अलाहाबादिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. सोबतच इंडियाज गॉट लेटेन्ट या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणीही केली गेली. याच प्रकरणात दाखल गुन्ह्यांनुसार मुंबई पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

विवाहित हिरोसोबत प्रेमसंबंधाचा आरोप, घातली होती थेट बंदी; सौंदर्याची खाण असलेली 'ही' हिरोईन आता काय करते?

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget