एक्स्प्लोर
Chhaava Box Office Collection: फक्त 3 दिवसांत 100 कोटींचा आकडा पार... बॉक्स ऑफिसवर आता फक्त आणि फक्त 'छावा'चाच ताबा
Chhaava Box Office Collection Day 3: विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या ऐतिहासिक नाटकाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

Chhaava Box Office Collection Day 3
1/11

2025 सालच्या सर्व चित्रपटांना मागे टाकत हा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला. यानंतर, या चित्रपटानं आठवड्याच्या शेवटी एकच खळबळ उडवून दिली आहे.
2/11

'छावा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे म्हणजेच, 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा ऐतिहासिक नाट्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे.
3/11

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांनाही विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट खूप आवडला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
4/11

चित्रपटानं ओपनिंग धमाकेदार केली आणि आठवड्याच्या शेवटीही 'छावा'वर पैशांचा वर्षाव झाला.
5/11

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सॅकॅनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'छवा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 19.35% वाढीसह 37 कोटी कमावले.
6/11

आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
7/11

सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छवा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 49.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, 'छावा'ची तीन दिवसांत एकूण कमाई आता 117.50 कोटी रुपये झाली आहे.
8/11

'छावा' चित्रपटानं रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे.
9/11

'छावा' मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.
10/11

कोई मोईनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट फक्त 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटानं आपल्या बजेटचा आकडा रिलीजच्या केवळ तीन दिवसांतच गाठला आहे.
11/11

या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे, तर विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.
Published at : 17 Feb 2025 10:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion