(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!
Cannes Film Festival 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायने एन्ट्री केली आणि आपल्या रेड कार्पेट लूकने सर्वांची मने जिंकली.
Cannes Film Festival 2022 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’च्या (Cannes Film Festival 2022 ) पहिल्या दिवशी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) रेड कार्पेटवर न दिसल्याने सगळ्यांनीच तिला मिस केले. मात्र, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायने एन्ट्री केली आणि आपल्या रेड कार्पेट लूकने सर्वांची मने जिंकली. रेड कार्पेट व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनचे आणखी दोन लूक समोर आले होते, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही केले गेले होते. कान्स 2022च्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या भडक रंगाच्या पोशाखात दिसली होती.
अनेक लोकांना ऐश्वर्याचा हा लूक अजिबात आवडला नाही आणि त्यांनी यावरून तिला ट्रोल केले. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याच्या अदा दाखवत सर्वांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी देखील ऐश्वर्या राय-बच्चन हिने एक सुंदरसा ड्रेस परिधान करत सर्वांच्याच नजरा स्वतःवर खिळवून ठेवल्या.
पाहा पोस्ट :
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय-बच्चनने आर्मागेडन टाईमच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. याआधी ती रेड कार्पेटवर सर्व फोटोग्राफर्ससमोर भरपूर फोटो पोज देताना दिसली होती. यादरम्यान ऐश्वर्या राय बच्चन पिक कलरच्या गाऊनमध्ये इतकी सुंदर दिसत होती की, सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ऐश्वर्या राय-बच्चन प्रत्येक वेळी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये येते, तेव्हा आपल्या सौंदर्याने सर्वांना मोहित करते. यंदाही तिने सर्वांना आश्चर्यचकित केले.
आराध्याचा व्हिडीओही चर्चेत
ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचा कान्स 2022 च्या एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिची खास मैत्रीण इवा लोंगेरियासोबत बोलताना दिसत आहे. यादरम्यान ईवाने आराध्याशीही संवाद साधला आणि तिच्या मुलाचेही आराध्याशी व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे करून दिले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते आराध्याच्या आत्मविश्वासाचे खूप कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या
Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले...
Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!
Cannes Film Festival 2022 : एक दिवस कान्स भारतात होईल; दीपिकाचा विश्वास