![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले...
Cannes Film Festival : 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागले आहे.
![Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले... Get to know PM Modi message on Cannes Film Festival 2022 know details Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/2d7e0be6ff601de70fbef230a4e49cef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi on Cannes : 'कान्स चित्रपट महोत्सव' (Cannes Film Festival) हा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव मानला जातो. आजपासून या 'कान्स चित्रपट महोत्सवा'ला सुरुवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवासंदर्भात ट्वीट करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत-फ्रान्सच्या राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिले आहे, 75 व्या कान्स चित्रपट महोत्सावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच भारत आणि फ्रान्सच्या राजकीय संबंधांनादेखील 75 वर्ष पूर्ण होत आहेत, हे खूप अभिमानास्पद आहे.
This edition of #CannesFilmFestival is special in many ways. Many Startups from India will showcase their strengths to the cinema world. India Pavilion will display facets of Indian cinema and promote international partnerships and learnings: PM Modi's message at #Cannes2022 pic.twitter.com/8ObLFXWwp2
— ANI (@ANI) May 17, 2022
17 ते 28 मे दरमम्यान पार पडणार 'कान्स चित्रपट महोत्सव'
'कान्स चित्रपट महोत्सव' हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. यंदा 17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव होणार आहे. तसेच यंदाच्या महोत्सावाची खासियत म्हणजे या महोत्साव स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होणार आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सावात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.
'कान्स' चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी मारली बाजी
कान्स चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी बाजी मारली आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona) या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार 'हे' कलाकार
कान्स चित्रपट महोत्सवात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. आर के रहमान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पूजा हेगडे, प्रसून जोशी, आर माधवन, शेखर कपूर, तमन्ना भाटिया आणि वाणी त्रिपाठी हे कलाकार कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो 'कान्स चित्रपट महोत्सवात' सहभागी होणार नाही.
संबंधित बातम्या
Cannes Film Festival : कान्स चित्रपट महोत्सवात साजरा होणार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!
Potra : 'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला एक लाखाची मदत; कान्स चित्रपट महोत्सवात सिनेमाची निवड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)