एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!

Cannes Film Festival 2022 : ‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे.

Cannes Film Festival 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 (Cannes Film Festival 2022 ) मधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लूक समोर आला आहे. ती ग्रँड हयात कान्स हॉटेल मार्टिनेझ येथे ज्युरी सदस्यांसोबत डिनरसाठी आली होती, तेव्हाचा हा लूक आहे. दीपिका पदुकोण तिच्या या लूकमध्ये सुंदर दिसली आहे. यादरम्यान ती खूपच स्टनिंग दिसत होती.

‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे, कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा भाग बनली आहे. ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवणार आहे. सध्या दीपिका फ्रान्समध्ये ज्युरी म्हणून उपस्थिती लावणार आहे.

दीपिका पदुकोण कान्स लूक

ज्युरी सदस्यांसह हॉटेल मार्टिनेझ येथे रात्रीच्या जेवणासाठी दीपिकाने लुई व्हिटॉनच्या फॉल 2021 कलेक्शनमधील सिक्विन ड्रेसची निवड केली होती. या ड्रेससोबत तिने तपकिरी रंगाचे उंच बूट परिधान केले होते. तिचे मोकळे केस आणि मेकअपही सुंदर दिसत होते.

तिच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलचे दिग्दर्शक थियरी फ्रॅमॉक्स, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, ज्युरी सदस्य जेफ निकोल्स, ब्रिटिश अभिनेत्री रेबेका हॉल, आणि इतर ज्युरी सदस्य होते.

दीपिका पदुकोणचा कान्स लूक झाला व्हायरल

दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीचे चाहते तिचा हा लूक शेअर करत आहेत. कान्स इव्हेंटमध्ये जाण्यापूर्वी दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि सांगितले की, ती यासाठी किती उत्साहित आहे. तिच्या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना फ्रान्स जर्नीबद्दल सांगितले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तिने फ्रान्सचे रस्ते, सिग्नल्स, लोक पाण्यात उड्या मारतानाचा दृश्य दाखवली आहेत. याशिवाय, तिच्या फ्लाइटबद्दल सांगताना तिने सांगितले की, हा 11 तासांचा प्रवास होता आणि यात ती पूर्णवेळ झोपली होती. यानंतर ती विमानतळावरून बाहेर पडताना दिसली. व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या टी-शर्ट आणि जॅकेटसह ब्लू डेनिम जीन्स परिधान केली होती, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget