Cannes Film Festival 2022 : एक दिवस कान्स भारतात होईल; दीपिकाचा विश्वास
Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे.
Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival) आता सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक दिग्गल कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या उद्धाटना दरम्यान दीपिका म्हणाली, एक दिवस कान्स भारतात होईल."
दीपिका म्हणाली, कान्स फिल्म फेस्टिवल'ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच भारतदेखील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताला 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. 15 वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता 15 वर्षांनंतर 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या मुख्य ज्यूरीचा भाग असणं आणि भारताचं प्रतिनिधित्व करणं या सगळ्याच गोष्टी खूप अभिमानास्पद आहेत.
#WATCH "India is at the cusp of greatness, this is just the beginning...there will come a day I truly believe where India won't have to be at Cannes, but Cannes will be in India," says Deepika Padukone at the inauguration of India Pavilion at the 75th Cannes Film Festival pic.twitter.com/66z9RLw2L0
— ANI (@ANI) May 18, 2022
17 ते 28 मे दरमम्यान पार पडणार 'कान्स चित्रपट महोत्सव'
'कान्स चित्रपट महोत्सव' हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. यंदा 17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव होणार आहे. तसेच यंदाच्या महोत्सावाची खासियत म्हणजे या महोत्साव स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होणार आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सावात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी 'कान्स चित्रपट महोत्सवा'त हजेरी लावत आहेत.
'कान्स' चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी मारली बाजी
कान्स चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी बाजी मारली आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona) या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
संबंधित बातम्या