दोनदा घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर; कोट्यवधींची मालमत्ता लंपास होण्याच्या भितीनं मामाच्या मुलीशीच उरकलं लग्न
Actor Ties Knot Third Time With Maternal Relative: दोन घटस्फोटांनंतर प्रसिद्ध अभिनेत्यानं तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; कोट्यवधींची मालमत्ता लंपास होण्याच्या भितीनं मामाच्या मुलीशीच उरकलं लग्न...

Actor Bala Ties Knot Third Time With Maternal Relative: सिनेस्टार्स आणि त्यांची पर्सनल लाईफ याबाबत आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या अशाच एका स्टारबाबत चर्चा रंगली आहे. याचं कारण आहे, त्यानं केलेलं तिसरं लग्न. एक नाही, दोन नाही तर या स्टारनं तब्बल तिनदा लग्न केलं आहे. लुसिफर, थंबी या चित्रपटांमधून गाजलेला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता बाला उर्फ बालकुमारनं तिसरं लग्न केलं आहे. सध्या बालाच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, बाला काही दिवस तुरुंगात होता. त्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच, बालानं आपल्या तिसऱ्या लग्नाची मोठ्या दणक्यात घोषणा केली आणि धुमधडाक्यात तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
प्रसिद्ध अभिनेता बाला (Actor Bala) उर्फ बालकुमारनं आपल्या मामाच्या मुलीशी तिसरं लग्न केलं. बालाच्या तिसऱ्या बायकोचं नाव कोकिला आहे. तिच्याबाबत चाहत्यांना सांगताना कोकीलापेक्षा चांगला लाईफ पार्टनर मिळू शकला नसता, असं बालानं म्हटलं आहे. बालानं सांगितल्यानुसार, कोकिला त्याच्या मामाची मुलगी असून गेली कित्येक वर्ष ती त्याच्या कुटुंबासोबतच राहते. तसेच, त्याच्या 74 वर्षांच्या आजारी आईचीसुद्धा कोकिला खूप काळजी घेते, असं बालानं सांगितलं.
View this post on Instagram
स्वकमाईची संपत्ती हडपण्याचा शिजतोय कट, बालाचा दावा
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बालानं आजवर अनेक हिट चित्रपट दिलेत. काही दिवसांपूर्वी बालानं एक संशय व्यक्त केला होता. बालानं म्हटलं होतं की, आजवर सिनेसृष्टीत मेहनत करुन त्यानं तब्बल 250 कोटींची संपत्ती कमावली आहे. त्याची मेहनतीनं कमावलेली कोट्यवधींची संपत्ती हडप करण्याचा कट शिजतोय, त्यामुळे माझी ही कोट्यवधींची संपत्ती सांभाळण्यासाठी मला कुणीतरी हवं आहे, असं बाला म्हणाला होता.
आतापर्यंत तब्बल तिनदा बोहल्यावर चढलाय अभिनेता...
सिनेस्टार बालानं यापूर्वी तीन लग्न केलीत. त्याची पहिली पत्नी प्रसिद्ध गायिका अमृता सुरेश हिनं नुकतंच तिच्या जीवाला धोका असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. तसेच, बालाविरोधात तिनं शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार दाखल केली होती. अमृतानं केलेल्या तक्रारीनंतर बालाला एका महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा आरोप करत बाल न्याय कायद्यांतर्गत केरळ पोलिसांनी अटक केली होती. मात्र, काही अटींवर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, बाला आणि अमृता यांना एक मुलगी आहे, जिचं नाव अवंतिका आहे. जी आता 12 वर्षांची आहे. मुलीनंही अभिनेत्याविरोधात छळाची तक्रार दाखल केली होती. त्या आरोपांखाली बालानं तुरुंगवारी केली होती.
27 ऑगस्ट 2010 रोजी अमृता-बालाचं लग्न झालं होतं, या जोडप्यानं 2012 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण, त्यानंतर चार वर्ष वेगळे राहिल्यानंतर दोघांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर बालानं 5 सप्टेंबर 2021 रोजी वैद्यकीय व्यावसायिक एलिझाबेथ उदयनशी दुसरं लग्न केलं. 2023 मध्ये, त्यानं आपल् दुसऱ्या पत्नीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. अशातच आता बालानं तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
