एक्स्प्लोर
Chhaava Movie: मुघलांच्या फौजेवर एकटा तुटून पडला, दोन सरदारांना संपवलं, औरंगजेब हादरला, शंभूराजांना वाचवण्यासाठी रक्त सांडणारा रायप्पा महार कोण?
Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आधारित छावा चित्रपटारम्यान रायाप्पा महार यांची सध्या चर्चा सुरु आहे.

Chhaava Movie
1/14

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट (Chhaava) काल (14 फेब्रुवारी) देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
2/14

छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे.
3/14

रायप्पा महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी खास सेवक होते. छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून तुळापुरहून बर्हानपूरला नेण्यात आले तेव्हा रायप्पा महार यांना सहन झाले नाही.
4/14

रायप्पा महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपलं रक्त सांडलं होतं.
5/14

छत्रपती संभाजी महाराज आणि रायाप्पा महार यांची लहानपणापासून मैत्री गठ्ठ होती. रायाप्पा महार तुळापुर जवळील तवं गावाचे रहिवाशी होते.
6/14

रायप्पा महार शंभूराजांच्या अंगरक्षक पदावर नियुक्त झाले. रायाप्पा महार यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शंभूराजांनी त्यांचा सन्मान देखील केला होता.
7/14

महाराणी येसूबाईना म्हणाले की, मी काहीही झाले तरी माझ्या राजाकडे जाणार...त्यानंतर रायप्पा महार यांनी थेट बऱ्हाणपूर गाठले आणि मुघली सैनिकांच्या वेशात त्यांच्यामध्ये मिसळून छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्याची संधी शोधू लागले.
8/14

शंभूराजांना वाचवण्यासाठी रायप्पा महारांनी लाखोंच्या मुघल सैन्यावर हल्ला केला होता.
9/14

लाखोंचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेले एकटा शूरवीर रायाप्पा महार यांनी क्षणातच त्याने दोन अंमलदारांना संपवले. या हल्ल्याने औरंगजेबसुद्धा हादरून गेला.
10/14

गनीम गनीम असा हलकल्लोळ मोगलांच्यात पसरला. संभाजी महाराजांचे साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायाप्पाच्या अंगावर लाखो समशेरीचे वार झाले.
11/14

रायाप्पा महार यांना शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीरमरण आले.
12/14

दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाई भूमिका साकारली आहे.
13/14

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाने केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
14/14

अक्षय खन्नाने देखील औरंगजेबची भूमिका केली आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे.
Published at : 15 Feb 2025 11:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion