एक्स्प्लोर

Palghar Crime News: पालघर हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, आठजण अटकेत

Palghar Crime News: एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Palghar Crime News: एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार (sexual assault on minor girl) केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील माहीम (Palghar Mahim) येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठ तरुणांना सातपाटी पोलिसांनी (Satpati Police)अटक केली आहे. हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 

पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आठजणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. मित्रानेच घडवून आणलेल्या या अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले. तिने झाल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देत आठ जणांविरोधात तक्रार नोंदवली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येतो. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या बंगल्यात आणि जवळील झाडीत या पिडीत अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार करण्यात आला. सर्वप्रथम या मुलीला तिच्या मित्राने या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने आठ जणांनी अत्याचार केले. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत. आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजते. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माहीम पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या वडिलांनी अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्रीपासून घरी आली नसल्याची तक्रार दिली. तिच्याशी फोनवर संपर्क साधला असता ती फोनवर रडत  असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तांत्रिक बाबींच्या आधारे मुलीचा शोध घेण्यास सायंकाळच्या सुमारास पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रसंग सांगतिला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या काळात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 

सध्या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे. 

गुंगीचे औषध देऊन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

अकोला शहरात दोन अल्पवयीन मुलींवर शुक्रवारी रात्री सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना शितपेयांतून दारू आणि गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर सामूहिक अत्याचार झाला असल्याचे समोर आले आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक मुलगी 15 आणि एक 17 वर्षे वयाची असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

16 डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखी युवक भेटला. लीप्ट देण्याच्या बहाण्याने या युकाने त्यांना  सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या 'पवन वाटिके'त घेऊन गेला. त्यानंतर तेथे त्याने या दोघींना चॉकलेट आणि शितपेय प्यायला दिले होते. त्यानंतर त्यांना गुंगी येऊ लागली. त्यानंतर त्या युवकाने आणि त्याच्या मित्राने दोघींवर अत्याचार केले. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अमरावतीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल
धक्कादायक! अमरावतीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल
सोलापुरातील करमाळा बसस्थानकावर महिलेचे 5 लाख 36 हजारांचे दागिने लंपास; बसमध्ये चढताना साधला डाव, गुन्हा दाखल
सोलापुरातील करमाळा बसस्थानकावर महिलेचे 5 लाख 36 हजारांचे दागिने लंपास; बसमध्ये चढताना साधला डाव, गुन्हा दाखल
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget