Abhishek Sharma : विराट-रोहित-गिल-सूर्या... अभिषेक शर्मा पुढे सगळेच फिके! वानखेडेवर भावाने एका झटक्यात मोडले अर्धा डझन रेकॉर्ड
Ind vs Eng 5th T20 : या सामन्यात अभिषेक शर्माने धमाकेदार खेळी केली आणि वानखेडेवर अर्धा डझन विक्रम मोडले.

Abhishek Sharma Record Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माने त्याच्या सर्वात संस्मरणीय खेळींपैकी एक खेळली. 24 वर्षीय अभिषेक शर्माने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले आणि फक्त 54 चेंडूत 135 धावा केल्या.
या सामन्यात अभिषेक शर्माने धमाकेदार खेळी केली आणि वानखेडेवर अर्धा डझन विक्रम मोडले. यावेळी इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी मुंबईच्या मैदानावर दिसले.
🎥 WATCH
— BCCI (@BCCI) February 2, 2025
Abhishek Sharma smashes India's second-fastest T20I TON in Men's Cricket 💯🔽#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
अभिषेकचे टी-20 मध्ये सर्वाधिक धावा
अभिषेक शर्माने पाचव्या टी-20 सामन्यात अर्धा डझन विक्रम मोडले आहेत. त्याने स्फोटक खेळी करून मुंबईच्या मैदानावर धुमाकूळ घातला आहे. जिथे त्याने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने शुभमन गिलचा (126 धावा) विक्रम मोडला.
एका डावात सर्वाधिक षटकार
अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध गगनचुंबी षटकार मारून खळबळ उडवून दिली आहे. त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारून माजी भारतीय टी-20 कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात त्याने स्फोटक खेळी केली आणि 13 षटकार मारले. तर रोहित शर्माने एका डावात 11 षटकार मारले होते.
सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज
अभिषेक शर्माने केवळ 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या बाबतीत त्याने टी-20 कर्णधार सूर्या आणि केएल राहुल यांना मागे टाकले आहे, ज्यांनी 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आहे, ज्याने 12 चेंडूत ही कामगिरी केली.
सर्वात जलद शतक ठोकण्याच्या बाबतीत दुसरे स्थान
अभिषेक शर्माने ऐतिहासिक शतक ठोकून भारतासाठी शतक करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने 40 चेंडूत शतक ठोकणाऱ्या भारतीय सलामीवीर संजू सॅमसनला मागे टाकले. पण, या प्रकरणात, माजी भारतीय टी-20 कर्णधार रोहित शर्मा आघाडीवर आहे, ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकले होते. एकूण कामगिरीवर नजर टाकल्यास, सर्वात जलद शतक ठोकण्याच्या बाबतीत अभिषेक शर्मा आता दुसऱ्या स्थानावर आहे.
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा
या सामन्यात अभिषेकच्या दमदार खेळीच्या मदतीने भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या सहा षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 95 धावा केल्या, जो टी-20 मध्ये पॉवरप्लेमधील त्यांचा सर्वोच्च धावसंख्या आहे. संघाने यापूर्वी 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये 2 बाद 82 धावा केल्या होत्या, जो या कालावधीतील त्यांचा सर्वोच्च धावसंख्या होता.
चौथी सर्वोच्च धावसंख्या
अभिषेक शर्माच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध 9 विकेट गमावून 247 धावा केल्या. ही भारताची टी-20 मधील चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने सर्वाधिक 297 धावा केल्या होतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

