Abhishek Sharma : 13 षटकार अन् 7 चौकार... 24 वर्षांच्या पोरानं भल्याभल्यांना घाम फोडला, अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं, उभं केलं नवं रेकॉर्ड!
जैसा गुरु वैसा चेला... टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने हे सिद्ध करून दाखवले आहे.

Abhishek Sharma India VS England 5th T20 : जैसा गुरु वैसा चेला... टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने हे सिद्ध करून दाखवले आहे. गुरु युवराज सिंग प्रमाणेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालत आहे. त्याचा सर्वात जबरदस्त फॉर्म मुंबईत पाहायला मिळाला, जिथे त्याने त्याच्या गुरू युवराजच्या शैलीत इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि फक्त 37 चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध 13 षटकार मारून सर्वात जलद टी-20 शतकाचा विक्रम केला.
⚡️💨 💯 Abhishek Sharma!pic.twitter.com/Kg2L2kdXW2
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 2, 2025
अभिषेक शर्माने मोडला रोहित शर्माचा विक्रम!
अभिषेक शर्माने आपल्या शानदार फलंदाजीने इतिहास रचला आहे. त्याने मुंबईत इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून अनेक विक्रम मोडले. अभिषेक शर्माने फक्त 54 चेंडूत 135 धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने त्याच्या डावात 13 षटकार मारून रोहित शर्माचा विक्रम मोडला. याआधी रोहित शर्माने टी-20 मध्ये एका डावात 10 षटकार मारले होते.
अभिषेकचे हे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे शतक आहे. भारतासाठी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके रोहित शर्माने केली आहेत. रोहितने 5 शतके ठोकली आहेत. 135 धावा करून, अभिषेकने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या करून इतिहास रचला आहे. अभिषेक शर्माच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 247 धावा केल्या.
भारताला पहिला धक्का इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दिला. त्याने संजू सॅमसनला 21 धावांवर बाद केले. सॅमसनने त्याच्या आक्रमक खेळीत 16 धावा केल्या पण वूडने त्याला बाद केले. भारतीय संघासाठी ही विकेट महत्त्वाची होती, कारण सॅमसन मोठ्या धावसंख्येच्या आशेने खेळत होता. यानंतर भारताला दुसरा धक्का तिलक वर्माच्या रूपात बसला, ज्याला ब्रायडन कार्सेने आऊट केले. तिलक वर्माने चांगली सुरुवात केली होती, त्याने 15 चेंडूत 24 धावा केल्या आणि त्यानंतर अभिषेक शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली.
सूर्यकुमार यादव पुन्हा फेल
यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला, पण तो पुन्हा ठरला. सूर्यकुमार यादवने तीन चेंडूत फक्त दोन धावा काढल्या, ब्रायडन कार्सने त्याला आऊट केले. भारतीय संघासाठी हा आणखी एक मोठा धक्का होता, कारण सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा खूप जास्त होत्या. शिवम दुबेने 13 चेंडूत 30 धावांची वेगवान खेळी खेळली पण शेवटी तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 6 चेंडूत फक्त 9 धावा काढून बाद झाला. वेगवान गोलंदाज मार्क वूडने त्याची विकेट घेत भारताला पाचवा धक्का दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
