एक्स्प्लोर
Baba Siddique Murder case : बाबा सिद्दीकींच्या डायरीत अदानींसह 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख, कोणाकोणाचा समावेश?
माजी आमदार बाबा सिद्दीकींच्या खून प्रकरणाचं गूढ वाढतच चाललं आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांच्या मुलाने मुंबईतील एका नेत्यासह 7 बिल्डर्सचा उल्लेख केला आहे, याशिवाय एका डायरीबद्दलही सांगितलं आहे.
Baba Siddique Murder case builders
1/10

महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात एक डायरी उघड केली आहे.
2/10

बाबा सिद्दीकींना रोज डायरी लिहिण्याची सवय होती आणि आता ही डायरी त्यांचा मुलगा झिशान यांने पोलिसांसमोर आणली आहे. या डायरीत बड्या नेत्यांची आणि बिल्डर्सची नावं आहेत.
3/10

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सातत्याने बाबा सिद्दीकी यांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. यानुसार वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यामुळे बाबा सिद्गीकी यांचा बड्या बिल्डर लॉबीशी वाद झाला होता.
4/10

बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स यांचा उल्लेख आहे.
5/10

त्यामुळे आता या सगळ्या बिल्डर्सचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.
6/10

झीशानने आपल्या वक्तव्यात कुठेही बिश्नोई टोळीचा उल्लेख केलेला नाही. आपल्या वडिलांच्या हत्येमागे राजकीय नेते आणि बिल्डर्सचा हात असल्याचं झिशान सिद्दीकींनी स्पष्ट केलं.
7/10

शिवाय, झीशानने दावा केला की त्याच्या वडिलांचे अनेक बिल्डर्सशी संपर्क होते, जे पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अडकले होते.
8/10

झीशानने सांगितलं की, एसआरए पुनर्विकास प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीत एका बिल्डरने त्याच्या वडिलांना शिवीगाळ केली होती.
9/10

झिशान सिद्दीकींनी आरोपपत्रात भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
10/10

या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते झीशान यांनी पोलिसांना या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली.
Published at : 28 Jan 2025 09:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























